
New Delhi : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. त्यातच आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
केजरीवालांनी दोन दिवसांपूर्वीच भागवतांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पत्र आता समोर आले आहे. यामध्ये त्यांनी आरएसएस भाजपसाठी दिल्लीतील निवडणुकीत मते मागणार असल्याचा मीडियात बातम्यांचा हवाला दिला आहे. पण याआधी लोक तुमच्याकडून जाणून इच्छितात की, मागील काही दिवसांपासून भाजपने जी चुकीच्या कामे केली आहेत, त्याला आरएसएसचे समर्थन आहे का, असा सवाल केजरीवालांनी केली आहे.
भाजपवर गंभीर आरोप करत केजरीवालांनी दोन मुद्द्यांकडे भागवतांचे लक्ष वेधले आहे. भाजप नेते उघडपणे पैसे वाटत मते विकत घेत आहेत. आरएसएस मते विकत घेण्याचे समर्थन करते का, असा प्रश्न केजरीवालांनी केला आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीतून अनेक मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याबाबत भागवतांना प्रश्न करण्यात आला आहे.
गरीब, दलित आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेकांची नावे वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक अनेक वर्षांपासाठी याठिकाणी राहत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी असे करणे योग्य आहे, असे आरएसएसला वाटते का, असा सवाल केजरीलांनी केला आहे. त्यापुढे त्यांनी म्हटले आहे की, भाजप यामाध्यमातून भारतीय लोकशाही कमजोर करत आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
दरम्यान, केजरीवालांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले होते. प्रामुख्याने पूर्वांचल भागातील मतदारांची मते मतदारयादीतून वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर निवडणूक आयोगानेही त्यांचा दावा फेटाळत स्पष्टीकरण दिले होते. पण केजरीवालांनी भागवतांना पत्र लिहून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.