Om Birla sarkarnama
देश

Om Birla : पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्लांनी सदस्यांना खडसावले, 'पुढील पाच वर्ष मला...'

Lok Sabha Speaker Om Birla : ओम बिर्ला हे बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी काही सदस्य देखील त्यांना बोलायचे असल्याचे सांगत उभे राहिले. त्यानंतर बिर्ला यांनी तुम्हाला संधी मिळेल, प्लीज असे म्हणत सदस्यांना खाली बसण्याचा इशारा केला.

Roshan More

Om Birla News : लोकसभा अध्यक्षपदी आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सदस्य भाषण करत होते. मात्र, लोकसभा निवडीच्या पहिल्याच दिवशी ओम बिर्ला यांना सदस्यांना खडसावले. 'जेव्हा लोकसभेचा अध्यक्ष उभा राहतो तेव्हा सदस्यांना बसायला हवे. हे मी पहिल्यांदा बोलतो आहे. पाच वर्ष मला हे बोलण्याची संधी देवू नका.' या शब्दांत बिर्ला यांनी सुनावले.

ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ओम बिर्ला हे बोलण्यासाठी आपल्या आसनावरून उभे राहिले होते. त्यावेळी अनेक सदस्य त्यांना बोलायचे असल्याने उभे राहिले. त्यामुळे बिर्ला यांनी या सदस्यांना सुनावले.

ओम बिर्ला Om Birla हे बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी काही सदस्य देखील त्यांना बोलायचे असल्याचे सांगत उभे राहिले. त्यानंतर बिर्ला यांनी तुम्हाला संधी मिळेल, प्लीज असे म्हणत सदस्यांना खाली बसण्याचा इशारा करत बोलण्या सुरवात केली. मात्र, असुद्दीन औवीसी यांच्यासह काही सदस्यांनी बोलण्याचा आग्रह धरला.

त्यामुळे बोलण्यासाठी उभे राहिलेले ओम बिर्ला पुन्हा आपल्या आसनावर बसले. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल. एक एक मिनीट बोला असे सांगितले. तसेच लोकसभा अध्यक्ष Lok Sabha Speaker बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा सदस्यांनी खाली बसावे, अशा कडक शब्दांत सुनावले.

तुमच्यावर भार पडू नये

असुद्दीन औवीसी यांनी नवनिर्वाचित लोकसभा सदस्य ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच विरोधीपक्षासह त्यांच्या सारख्या छोट्या पक्षांना देखील बोलण्याची संधी द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच लोकसभा अध्यक्षपदाचा भार मोठा असल्याने येवढा भार तुमच्यावर टाकणार नाहीत. उपाध्यक्षाची देखील निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT