Video Sanjay Raut : संजय राऊत औवेसीच्या पाठिशी? पॅलेस्टाईन संदर्भात सरकारची भूमिका काय?

Sanjay Raut Asaduddin Owaisi : मोदींना संसदेतून पळ काढता येणार नाही. त्यांना येता जाता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रामराम करावे लागेल तसे संकेत आहेत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
Asaduddin Owaisi Sanjay Raut
Asaduddin Owaisi Sanjay Rautsarkarnama

Sanjay Raut : लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेताना असुद्दीन औवेसी यांनी आपल्या शपथेनंत पॅलेस्टाईनचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. रामदास कदम यांनी देखील ही मागणी केली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित

पॅलिस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? हे आधी स्पष्ट करावं. औवसीकडून चूक झाली असेल तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी संजय राऊत Sanjay Raut यांनी सरकारला जबाबदार धरले. त्यांचा हुकूम मानणारे गेले 10 वर्षांपासून त्या पदावर बसतात. एकाच वेळी विरोधी पक्षातील 140 सदस्यांना निलंबित केले जाते. ही निवडणूक आमच्यावर लादली. के सुरेश सगळ्यात वरिष्ठ सदस्य आहेत. पण ते काँग्रेसचे असल्याने त्यांना डावले. यांचा सुंभ जळला पण पिळ कायम आहे.

Asaduddin Owaisi Sanjay Raut
Chandrakant Patil Vs Ravindra Dhangekar : चंद्रकांतदादांनी ठेवलं धंगेकरांच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; म्हणाले...

परंपरेने विरोधीपक्षाकडे लोकसभेचे उपाध्यक्ष पद दिले जाते. आहे. निवडणुकीचा फेरविचार करू उपाध्यक्ष पद दावे असे म्हटले होते.मात्र,कोणताही शब्द मिळाला नाही. त्यामुळे विरोधीपक्षाची एकजुट दाखवणे गरजेचे होते, असे संजय राऊत म्हणाले.

मोदींना राहुल गांधींना रामराम करावा लागेल

राहुल गांधींनी Rahul Gandhi विरोधी पक्षनेते पद स्वीकारने हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने शूभसंकेत आहेत. आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे. आता मोदींना संसदेतून पळ काढता येणार नाही. त्यांना येता जाता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रामराम करावे लागेल तसे संकेत आहेत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने झाली. लोकसभा अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या आसना जवळ जात हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले.

Asaduddin Owaisi Sanjay Raut
Asaduddin Owaisi : औवेसींची जीभ छाटा अन् 'हे' बक्षीस घेऊन जा; कोणी केलं आवाहन?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com