Pahalgam terror attack : मोदी सरकारकडून पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक कठोर पावलं उचलले जात आहेत. या हल्ल्याची तपासाची सूत्रे आता एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत. एनआयएच्या आत्तापर्यंतच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यातच आता एनआयएकडून (NIA) लवकरच या हल्ल्यासंबंधीच्या तपासाचा अहवाल अमित शाहांच्या गृहमंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrror Attack) येथील हल्ल्यानंतर एनआयएच्या तपासानं वेग घेतला आहे. एनआयएकडून आत्तापर्यंत या हल्ल्याशी संबंधित 3000 हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे शंभरहून अधिक ठिकाणांवरही छापेमारी सुरू आहेत.
एनआयएने आत्तापर्यंत व्यापक फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक डेटा जमवणं सुरू केलं आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी जप्त केलेले 40 हून अधिक काडतुसे बॅलिस्टिक आणि रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. तपास पथकाकडून हल्ल्याच्या ठिकाणाचे थ्रीडी मॅपिंग करण्यात आले असून आणि खोऱ्यातील मोबाइल टॉवर्समधून डंप डेटा काढला गेला आहे.
हल्ल्याच्या काही दिवसांत या प्रदेशात सॅटेलाइट फोनच्या हालचाली वाढल्या असल्याचं लक्षात आलं आहे. बैसरन आणि त्याच्या आसपास किमान तीन सॅटेलाइट फोन कार्यरत होते आणि त्यापैकी दोनचे सिग्नल ट्रेस करून त्यांचे अंदाज लावण्यात येत आहे.
एनआयएने आतापर्यंत 2800 लोकांची चौकशी करण्यात आली असून 150 लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यावरून या ठिकाणी कोण कोण होतं आणि ते कुणाकुणाच्या संपर्कात होते ही माहिती मिळणार आहे. तपास यंत्रणेला घटनास्थळी 40 हून अधिक काडतूसांचे खोके सापडले आहेत. हे काडतूस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
एनआयएच्या तपास यंत्रणेकडून बैसरन घाटीत काम करणार्या टुरिस्ट गाईड,जिप लाइन वर्कर्स, हॉटेल मालक, फोटोग्राफर्स, दुकानदार,टुरिस्ट गाईड,जिप लाइन वर्कर्स,हॉटेल मालक आणि इतरांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज पाहून दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांना वापरलेल्या सॅटेलाइट फोनचाही तपास केला आहे
एनआयएचे महासंचालक (डीजी)सदानंद दाते हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करतील. केंद्र सरकार या हल्ल्याबाबत अत्यंत गंभीर आहे आणि तपास यंत्रणांना सर्व पैलूंची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयए पथकाने पीडित कुटुंबांचे जबाबही नोंदवले होते.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना घडवून आणल्यानंतर दहशतवादी पळून गेले होते. या घटनेनंतर एनआयएनेही हल्ल्याचा तपास सुरु केला. एनआयए अधिकाऱ्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. त्यावेळी ते त्यांच्यासोबत होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना का लक्ष्य केले आणि त्यामागील त्यांचा हेतू काय होता, या घटनेच्या तळाशी जाण्याचा तपास पथक प्रयत्न करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.