Pahalgam Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी 'एनआयएचा' नवा 'प्लॅन'; सदानंद दाते बैसरण खोऱ्यात येताच तपासाला वेग

Pahalgam Terrorist Attack : "हर एक आतंकवादी को चुन चुन के मारेंगे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक धोरण स्वीकारल्याचे सांगितले.
Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist Attacksarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terrorist Attack : "हर एक आतंकवादी को चुन चुन के मारेंगे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक धोरण स्वीकारल्याचे सांगितले. पण या हल्ल्याला 10 दिवस उलटल्यानंतरही राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला अद्याप एकाही दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर एनआयएने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवा प्लॅन आखला आहे. एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांनी बुधवारी (1 मे) बैसरण खोऱ्यात भेट दिली. त्यानंतर तपासाला वेग आला आहे. एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह पहलगाम येथे पोहोचली.

Pahalgam Terrorist Attack
BJP Politics : भाजपचा बड्या नेत्यांना धक्का; RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला खासदारकी बहाल, दक्षिणेत काय आहे प्लॅन?

या टीमकडून आता बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, हल्ल्यानंतर कोणत्या मार्गाने पळ काढला, याचा शोध घेतला जात आहे. या थ्रीडी मॅपिंगसाठी आतापर्यंत नोंदवलेले प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाचाही वापर करण्यात येत आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींचा अचूक मागोवा घेणे शक्य होणार आहे.

बुधवारी एनआयएच्या टीमने बॉम्ब निकामी पथक आणि न्यायवैद्यकीय तज्ज्ञांच्या साथीने घटनास्थळी 7 तास सखोल तपास केला. पहलगाम पोलिस ठाण्यात 100 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. यामध्ये झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिलचाही समावेश होता. तसेच परिसरातील कामगार आणि घोडेवाले यांची चौकशी केली. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pahalgam Terrorist Attack
BJP Maharashtra : जिल्हाध्यक्षांच्या घोषणेचा भाजप करणार 'ग्रँड इव्हेंट'; 78 जणांना खुर्चीत बसवण्याचा मुहूर्त ठरला!

अटारी-वाघा सीमा बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिजा तातडीने रद्द करत त्यांना पुन्हा पाकिस्तानला जाण्याचे आदेश दिले होते. अटारी-वाघा सीमेच्या मार्गे भारतात असलेले पाकिस्तानी नागरिक पुन्ह जात होते. आत्तापर्यंत 911 पाकिस्तानी नागरिक या मार्गाने पाकिस्तानात गेल्याची माहिती आहे. आता ही सीमा बंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com