nilesh lanke
nilesh lanke sarkarnama
देश

Video Nilesh Lanke : नीलेश लंकेंनी विखेंच्या नाकावर टिच्चून लोकसभेत इंग्रजीतून घेतली शपथ

Akshay Sabale

मी इंग्रजीतून भाषण केले, नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत इंग्रजीतून भाषण करून दाखवावं, असं आव्हान माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिलं होतं.

हे आव्हान स्वीकारत नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी खासदार होताच संसदेत इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे नीलेश लंके यांनी विखेंच्या नाकावर टिच्चून इंग्रजीतून शपथ घेतल्यानं चर्चेचा विषय बनली आहे.

नेमकं काय प्रकरण?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नगरमध्ये धुरळा उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी 'रील' पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे. काहीजण फक्त रिल्स करून काम केल्याचा आव आणतात,' असं सांगत डॉ. विखे-पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवली होती. यात डॉ. विखे-पाटील यांनी संसदेत इंग्रजीतून केलेल्या भाषणांचाही समावेश होता.

हा धागा पकडून डॉ. विखे-पाटील म्हणाले, "मी जेवढं इंग्रजी बोलतो, तेवढं समोरच्या उमेदवारानं किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावं. तसं झालं तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही."

नीलेश लंके यांनी विखे-पाटील यांचं आव्हान स्वीकारत संसदेत 'फाडफाड' इंग्रजीतून बोलून दाखवणार, असं म्हटलं होतं. यानंतर अटीतटीच्या लढतीत नीलेश लंकेंनी विखे-पाटील यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता.

यातच संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. महाराष्ट्रातील शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांनी शपथ घेतली. यावेळी नीलेश लंकेंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नीलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानं लोकसभेत चर्चेचा विषय बनला. खासदरकीची शपथ घेतल्यानं लंकेंनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT