Family members of Nimisha Priya receive news of the execution postponement as the Indian government facilitates negotiations in Yemen.  Sarkarnama
देश

Nimisha Priya’s Case : मोठी बातमी : निमिषा प्रिया यांची उद्याची फाशी टळली; भारताला मोठं यश, नेमकं काय घडलं?

Background of Nimisha Priya’s Case in Yemen : येमेनमधून भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. तेथील सरकारने निमिषाची फाशी पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी मौल्यवान वेळ मिळाला आहे.

Rajanand More

Government of India’s Role and Support : केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांना बुधवारी (ता. 16) येमेनमध्ये फाशी दिली जाणारी फाशी अखेर टळली आहे. निमिषा यांना वाचविण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरूच ठेवण्यात आले होते. तसेच भारतातील सुन्नी नेते कंथापुरम ए. पी. अबूबक्कर मुस्लियार म्हणजे ग्रँड मुफ्ती यांनी निमिषा यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले होते.

येमेनमधून भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. तेथील सरकारने निमिषाची फाशी पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी मौल्यवान वेळ मिळाला आहे. निमिषाला तिच्या बिझनेस पार्टनरच्या खूनप्रकरणी स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बुधवारी (ता. 16) फाशी दिली जाणार होती.

निमिषा प्रिया यांना फाशी होण्यापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात होते. या प्रकरणातील गांभीर्य पाहता निमिषा यांना वाचविणे शक्य नसल्याचे सांगितल जात होती. पण आता त्यांना सध्यातरी मोठा दिलासा मिळाला आहे. निमिषा या २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात आहेत. येमेनमधील नागरिक तलला एब्दो महदीच्या खूप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

निमिषा यांच्या म्हणण्यानुसार, महदी याने त्यांचा पासपोर्ट घेतला होता. तो मिळविण्यासाठी त्याला गुंगीचे औषध दिले होते. पण ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा निमिषा यांनी केला होता. मात्र, कोर्टाकडून त्यांचा दावा फेटाळून लावत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्या मुळच्या केरळमधील पलक्कड येथील आहे.

दरम्यान, मुफ्ती हे मंगळवारी येमेनमध्ये तलाल च्या कुटुंबीय किंवा निकटवर्तीयांना भेटणार आहेत. येमेनमधील धमार शहरात ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. निमिषा यांच्या बचावासाठी पहिल्यांदाच मृतकाच्या कुटुंबांची भेट घेतली जाणार आहे. मुफ्ती यांच्याकडून कुटुंबियांचे ‘ब्लड मनी’ म्हणजे आर्थिक भरपाईसाठी मन वळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. यापूर्वी या कुटुंबाने ब्लड मनी घेण्यास नकार दिल्याची चर्चा होती.

ग्रँड मुफ्ती यांनी येमेनमधील बड्या धार्मिक नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. या मध्यस्थीमुळे पहिल्यांदाच तलालचे कुटुंब चर्चेसाठी तयार झाले आहे. येमेनमधील सुफी आलीम शेख हबीब यांनी त्यासाठी मध्यस्थी केली आहे. बैठकीमध्ये तलालचे जवळचे नातेवाईक असणार आहेत. ते हुददा स्टेट कोर्टचे मुख्य न्यायाधीश आणि यमनी शूर कौन्सिलचे सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT