
India’s Grand Mufti and Sunni Leader from Kerala Step In : केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांना बुधवारी (ता. 16) येमेनमध्ये फाशी दिली जाणार आहे. ही फाशी टाळण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केल्याचे सांगत मोदी सरकारने सोमवारीच सुप्रीम कोर्टात हतबलता दर्शविली होती. केवळ ‘ब्लड मनी’ हा एकमेव पर्याय असल्याचे सरकारने सांगितले होते. आता निमिषा यांना वाचविण्यासाठी अखेरचा आशेचा किरण दिसला आहे.
भारतातील सुन्नी नेते कंथापुरम ए. पी. अबूबक्कर मुस्लियार म्हणजे ग्रॅंड मुफ्ती यांनी निमिषा यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निमिषा यांना येमेनमधील स्थानिक न्यायालयाने त्यांचा बिझनेस पार्टनर तलाल अब्दो मेहदी यांच्या खूनप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मुफ्ती हे मंगळवारी येमेनमध्ये तलाल च्या कुटुंबीय किंवा निकटवर्तीयांना भेटणार आहेत.
येमेनमधील धमार शहरात ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. निमिषा यांच्या बचावासाठी पहिल्यांदाच मृतकाच्या कुटुंबांची भेट घेतली जाणार आहे. मुफ्ती यांच्याकडून कुटुंबियांचे ‘ब्लड मनी’ म्हणजे आर्थिक भरपाईसाठी मन वळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. यापूर्वी या कुटुंबाने ब्लड मनी घेण्यास नकार दिल्याची चर्चा होती.
ग्रँड मुफ्ती यांनी येमेनमधील बड्या धार्मिक नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. या मध्यस्थीमुळे पहिल्यांदाच तलालचे कुटुंब चर्चेसाठी तयार झाले आहे. येमेनमधील सुफी आलीम शेख हबीब यांनी त्यासाठी मध्यस्थी केली आहे. बैठकीमध्ये तलालचे जवळचे नातेवाईक असणार आहेत. ते हुददा स्टेट कोर्टचे मुख्य न्यायाधीश आणि यमनी शूर कौन्सिलचे सदस्य आहेत.
बैठकीमध्ये कुटुंबाचे ब्लड मनीसाठी मन वळविणे आणि येमेनच्या अटर्नी जनरल यांना भेटून 16 जुलैची निमिषा यांची फाशीची शिक्षा टाळण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. मृतकाच्या कुटुंबाने चर्चेसाठी तयारी दर्शविणे, ही मोठी सकारात्मक बाब असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी या कुटुंबातील सदस्य कुणालाही भेटले नव्हते.
कंथापुरम यांनी येमेन सरकारलाही निमिषा यांच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. ही शिक्षा काही दिवस पुढे ढकलण्याची विनंती केल्याचे सांगितले जात आहे. येमेन सरकारकडूनही या विनंतीला मान दिला जाऊ सकतो. कुटुंब ब्लड मनीसाठी तयार झाले तर शिक्षा रद्दही होऊ शकते. शरिया कायद्यानुसार, मृतकाच्या कुटुंबाने भरपाई घेतल्यास आरोपीला माफ केले जाते. त्यालाच ब्लड मनी म्हणतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.