Supriya Sule_Arvind Sawant 
देश

Aditya Thackeray: 'नारी शक्ती'वर चर्चा सुरु असताना निशिकांत दुबेंनी घेतलं आदित्य ठाकरेंचं नाव! अरविंद सावंत, सुप्रिया सुळे संतापले; विशेष अधिवेशनात नेमकं काय घडलं?

Aditya Thackeray: नारीशक्ती वंदन अधिनियम आणि घटना दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा सुरु असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं जोरदार खडागंजी झाली.

Amit Ujagare

Aditya Thackeray: नारीशक्ती वंदन अधिनियम आणि घटना दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा सुरु असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं जोरदार खडागंजी झाली. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दुबेंच्या विधानावर जोरादर आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर तात्काल कारवाई करण्याची मागणी लाऊन धरली.

सभागृहात नेमकं काय घडलं?

लोकसभेत नारीशक्ती वदंन अधिनियमावर चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण पार पडलं. त्यानंतर लगेचच ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांना बोलण्याची संधी दिली गेली. सावंत बोलत असताना त्यांनी हे विधेयक आणण्यामागे भाजपच्या हेतूवर शंका उपस्थित केली. पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी या पाच राज्यात निवडणूक असल्यानं सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. म्हणजेच सरकारला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मतं मिळवण्यासाठी हे मंजूर करायचं आहे, असा सणसणीत आरोप केला. त्यानंतर त्यांनी भाजपचे माजी खासदार कुलदीप सिंह सेनगर, ब्रिजभूषण शरण सिंह या महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींची नावं घेतली आणि सरकारला महिलांच्या कल्याणाचं काहीही पडलेलं नाही असा आरोप केला.

दरम्यान, अरविंद सावत यांचं भाषण सुरु असतानाच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जागेवर उठून उभं राहतं, थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेत त्यांनी एका हिरॉईनचा जीव घेतला असल्याचं म्हटलं. त्यांच्या या विधानामुळं अरविंद सावंत चांगलेच भडकले आणि इथं विनाकारण आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये, असं ठणकावलं. दरम्यान, सावंत आणि सुप्रीया सुळे यांनी अशा प्रकारे नावं घेणं चुकूचं असल्याच म्हटलं. यामुळं एकच गदारोळ सुरु झाला, तुम्ही आदित्य ठाकरेंचा नाव कसं का घेता? असा सवाल करत निशिकांत दुबेंवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT