Nari Shakti Vandan Bill: "महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यास दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील"; PM मोदींचा विरोधकांना इशारा

Nari Shakti Vandan Bill: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संसदेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

Nari Shakti Vandan Bill: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संसदेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सरकारची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या विधेयकाला राजकीय चष्म्यातून न पाहण्याची विनंती केली तसंच जे आज या विधेयकाला विरोध करतील त्यांना दीर्घकाळ याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

PM Narendra Modi
Nari Shakti Vandan Act: रेखा गुप्ता दिल्लीच्या अर्ध मुख्यमंत्री! भाजपकडून नारीला 'नारा' बनवण्याचा उद्योग सुरु; अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

मोदी म्हणाले, मला विश्वास आहे की या मंथनमधून जे अमृत निघेल त्यातून देशातील राजकारणाचं रुप-स्वरुप निश्चित तर होणारच आहे पण देशाची दिशा आणि दशा देखील निश्चित करणार आहे. आपल्या देशात जेव्हापासून महिला आरक्षणावरुन चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळी प्रत्येक निवडणुकीत महिलांना मिळणाऱ्या या अधिकाराचा ज्यानं ज्यानं विरोध केला आहे देशातील महिलांनी त्यांना माफ केलेलं नाही, त्यांची अवस्था अत्यंत वाईटात वाईट केली. पण २०२४ च्या निवडणुकीत असं झालं नाही कारण २०२४ मध्ये सर्वसहमतीनं हे विधेयक मंजूर केलं त्यामुळं कोणाच्याही पारड्यात राजकीय फायदा गेला नाही आणि नुकसानही झालं नाही.

PM Narendra Modi
Nashik Corruption : नाशिकमध्ये लाचखोरीचा कहर ; २१० अधिकारी ACB च्या जाळ्यात, मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे..

सहजरुपानं जे मुद्दे होते त्या आधारे निवडणूक लढली गेली. त्यावेळी सर्वजण सोबत होतो. आजही मी हेच म्हणतो की, जर आपण सर्वजण सोबत राहिलो तर इतिहास साक्षी आहे हा निर्णय कोणाच्याही एकाच्या राजकीय बाजूनं जाणार नाही. हा देशाच्या लोकशाहीच्या बाजूनं जाईल, देशाच्या सामुहिक निर्णयाच्या शक्तीच्याबाजून जाईल. आपण या यशाचे सर्वजण हक्कदार राहू. केवळ मोदी याचे हक्कदार राहणार नाही, तर इथं बसलेले सर्वजण त्याचे हक्कदार राहतील.

PM Narendra Modi
महिला आरक्षणासह खासदारांची संख्या 850 होणार; संसदेचे विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी?

त्यामुळं ज्या लोकांना यात राजकारणाचा वास येतो आहे, मला वाटतं त्यांनी गेल्या तीस वर्षात आपल्यावर काय परिणाम झाला हे त्यांना जाणून घ्यावं. यात त्यांचाही फायदा आहे त्यामुळं मी त्यांना रस्ता दाखवतो आहे. त्यामुळं फायदा यातच आहे की जे नुकसान होणार आहे त्यापासून वाचाल. त्यामुळं याला राजकीय रंग देण्याची गरज नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com