Nitin Gadkari  Sarkarnama
देश

Nitin Gadkari : कधीही तिसरं महायुद्ध होऊ शकतं, गडकरींचा गंभीर इशारा !

Nitin Gadkari warns of potential Third World War, highlights global conflict, rising military tensions : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जगात कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध पेटू शकतं अशी चिंता व्यक्त केली आहे.

Ganesh Sonawane

Third World War : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जगात कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध पेटू शकतं अशी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जगात सुसंवाद, प्रेम आणि शांती कमी होत आहे. अशा स्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्द होऊ शकतं.

गडकरी पुढे म्हणाले, जगात सध्या संघार्षाचे वातावरण आहे. आपण सर्वजण हळूहळू विनाशाकडे वाटचाल करत आहोत. महासत्तांच्या हुकूमशाही आणि राजवटीमुळे जगात संवाद, प्रेम आणि सौहार्द संपत चाललं आहे. इराण, इराक आणि इस्रायल यांच्यात सुरु असणारं युद्ध तसेच युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेलं युद्ध या दोन्ही युद्दांच्या पार्श्वभूमीवर जगात कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं अशी स्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मानवतेचे रक्षण करणे कठीण होत चालले आहे कारण आजची युद्धं तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत झाली आहेत. टँक आणि लढाऊ विमानांसारख्या शस्त्रांचे महत्त्व कमी होऊन आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सारख्या शस्त्रांचा वापर वाढला आहे. दुर्दैवाने, आता मानवी वस्त्यांवरही मिसाईल टाकली जात आहेत, त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असल्याचे गडकरींनी नमूद केले.

काही महासत्तांची हुकूमशाही हे यामागील कारण असून महासत्तांच्या हुकूमशाही आणि राजवटीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे अधोरेखित करताना त्यांनी या मुद्द्यांवर जगभरात चर्चा झाली पाहिजे आणि वेळेवर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं.

संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा हा देश आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर घडणाऱ्या या सर्व घटनांचा मागोवा घेऊन त्यावर चिंतन करण्याची व धोरण ठरवण्याची गरज असल्याचं गडकरी म्हणाले.

दरम्यान त्यांनी देशातील परिस्थितीवर चर्चा केली. आपल्या देशात संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाल्याचे ते म्हणाले. कारण देशात एकीकडे गरीब वाढत चालले आहेत तर दुसरीकडे काही श्रीमंतांच्या हातात संपत्ती वाढत चालली आहे. अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचं विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT