Nitish Kumar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या लैंगिक शिक्षणाबबात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून मोठा निर्माण झाला. नितीशकुमार यांची महिला वर्गातून आणि सोशल मीडियासह समाजातील सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याची मागणी केली. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली. आणि त्यांनी विधानसभेत माफी मागितली.
'बोलण्याच्या ओघात मी सहज बोलून गेलो. पण माज्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो', असं नितीशकुमार विधानसभेत म्हणाले. महिलांच्या शिक्षणावर मी भर देत होतो. पण माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी आपले शब्द मागे घेतो. मी स्वतःचीच निंदा करतो. आणि हे लज्जास्पद आहे आणि मी खेद व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री नितीशकुमार विधानसभेत म्हणाले. यावेळी विरोधी पक्षांनी सभागृहात मोठा गदारोळ केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेत नितीशकुमार काय म्हणाले?
सर्व संमतीने एक-एक निर्णय घेण्यात आला. आपण महिला साक्षरतेवर किती भर देतो. मुलगी शिक्षित असेल तर जन्मदर हा २ टक्के आहे. मुली आता उच्चशिक्षित होत आहेत. हे मांडताना माझ्या वक्तव्याने कोणाच्या मन दुखावलं असेल तर मी शब्द मागे घेतो. मी स्वतःचीच निंदा करतो. मला याची लाज वाटतेय आणि खेद व्यक्त करतो, असं नितीशकुमार विधानसभेत म्हणाले.
यापूर्वी नितीशकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या वक्तव्यावरून इतकी निंदा होत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी तर सहज बोलून गेले होतो. माझं म्हणणं चुकीचं असेल तर मी ते मागे घेतो. कोणी माझी निंदा करत असेल तर मी त्याचे अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.
का निर्माण झाला वाद?
नितीशकुमार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षणावर निवेदन दिले. महिलांच्या शिक्षणामुळे राज्यात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यास मदत झाल्याचे यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. लग्नानंतर पुरुष पत्नीशी लैंगिक संबंध प्रस्थापिक करतो (यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हातांनी काही सूचक इशारे केले ). पण आम्ही महिलांना शिक्षित केल्यामुळे त्या योग्य वेळी पतीला लैंगिक संबंध करण्यास रोखत आहेत. यामुळे बिहारची लोकसंख्या नियंत्रणात आहे, असं नितीशकुमार यांनी पुढे म्हटलं. यानंतर नितीशकुमार यांनी अश्लील वक्तव्य केल्याची टीका विरोधकांनी केली. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पाठराखण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.