Bihar Cabinet Expansion Sarkarnama
देश

Bihar Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक अन् जातीय समतोल; या सात जणांना संधी

मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे चित्र आहे. यात भाजपच्या कोट्यातील सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

Mangesh Mahale

बिहार विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी नीतीश कुमार सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या (गुरुवारी) होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे चित्र आहे. यात भाजपच्या कोट्यातील सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

बिहार विधानसभेत एकूण 243 सदस्य आहेत. त्यानुसार 15% कोट्यानुसार बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे एकूण 36 मंत्री होऊ शकतात. सध्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच 30 कॅबिनेटमंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. म्हणजे 6 मंत्रिपदे रिक्त आहेत.

बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 'एक व्यक्ती एक पद'या भाजपच्या अलिखित नियमानुसार त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे मंत्रिपदाच्या 7 जागा रिक्त आहेत. या सात जागेवर कुणाची वर्णी लागले याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि नीतीश कुमार यांची खलबत झाली. त्यानंतर आज पहाटेच नीतीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासोबत चर्चा करुन मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची याबाबतची नावे फायनल केली. मंत्रिमंडळ विस्तारास जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्या मंत्र्यांची संभाव्य नावे

कृष्ण कुमार मंटू :छपरा विधानसभेचे आमदार कृष्ण कुमार मंटू (जात-कुर्मी), ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. माजी केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रूडी यांचे निकटवर्तीय आहेत.

विजय मंडल:सिकटी विधानसभेचे आमदार असून ते केवट जातीचे आहेत. या मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. येथे भाजप-जनता दल यूनायटेड यांच्यात लढत असते.

राजू सिंह: मुजफ्फरपुर येथील सटे साहिबगंजचे आमदार आहेत. ते राजपूत समाजाचे आहेत. 'दंबग'राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रीय आहेत.

संजय सरावगी: दसभंगाचे आमदार असून ते मारवाडी समाजाचे आहेत. अनेक वर्षापासून ते निवडून येत आहेत. ते आरएसएससोबत त्यांचा निकटचा संपर्क आहे.

जीवेश मिश्रा: जीवेश मिश्रा हे माजी मंत्री असून त्यांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. ते भूमिहार समाजाचे आहेत. भूमिहार समाजाचे राजकारणात स्थान देण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे.

सुनील कुमार: हे कुशवाहा समाजातील आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, सर्व राजकीय पक्षांना या समाजाकडे दुर्लक्ष करीत नाही.

मोती लाल प्रसाद: मोती लाल प्रसाद हे रीगा विधानसभेचे आमदार आहेत, ते तेली समाजाचे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT