Nitish Kumar News Sarkarnama
देश

Nitish Kumar News : शपथविधीनंतर नितीशकुमार पुन्हा राजभवनात गेले अन् राज्यपालांना बसला धक्का...

Jairam Ramesh : काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याकडून नितीशकुमारांना खोचक टोला...

Rajanand More

Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी रविवारी नवव्यांदा शपथ घेतली. पण या शपथविधीनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. नितीशकुमारांनी तयार केलेली विकासपुरूष अशी प्रतिमा धूसर झाली असून ‘पलटूराम’ सध्या सोशल मीडियात ट्रेंगिक आहे. त्यावर अनेक मीम्स, विनोद व्हायरल होत आहेत. यामध्ये देशातील बडे नेतेही मागे नाहीत.  

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनीही नितीशकुमारांना (Nitish Kumar) खोचक टोला लगावला आहे. नितीशकुमारांनी मागील चार वर्षांत दोनवेळा पलटी मारली आहे. भाजपसोबत (BJP) संसार मोडत ते आरजेडीसोबत आले होते. त्यानंतर पुन्हा ते भाजपसोबत गेले. त्याआधीही त्यांनी अशाचप्रकारे दोन्ही पक्षांची साथ अचानक सोडली होती. त्यामुळे विरोधकांकडून त्यांची प्रतिमा ‘पलटूराम’ अशी करण्यात आली आहे.

जयराम रमेश यांनी हीच संधी साधत सोशल मीडियात एक पोस्ट केली केली आहे. ‘नितीशकुमार आपला मफलर राजभवनातच विसरले होते. शपथ घेतल्यानंतर राजभवनात बाहेर पडले आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांचे हे लक्षात आले. ते पुन्हा मफलर घेण्यासाठी गेल्यानंतर राज्यपालांना धक्का बसला. यावेळी तर 15 मिनिटेही झाली नाहीत’, असे खोचक ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसची न्याय यात्रा बिहारमध्ये

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमध्ये दाखल झाली. बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही यात्रा आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता या यात्रेत आरजेडीचे तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यादव सहभागी होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT