Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश

Maharashtra : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक घेतली जाणार...
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. ही निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीआधीच राज्यसभेचा धुरळा उडणार आहे. (Rajya Sabha Election 2024 )

महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar), नारायण राणे (Narayan Rane), व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan), शिवसेनेचे अनिल देसाई (Anil Desai) आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर निवृत्त होणार आहेत. दोन एप्रिलला त्यांची मुदत संपणार आहे. देशातील 13 राज्यांतील एकूण 50 खासदार यादिवशी निवृत्त होत आहेत. तर दोन राज्यातील सहा खासदारांची मुदत तीन एप्रिलला त्यांची मुदत संपत आहे.

Rajya Sabha Election
CAA News : केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा; देशात सात दिवसांत लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा

निवडणूक आयोगाकडून या जागांच्या निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया 8 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याचे सत्तासमीकरण पाहता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच पारडे जड राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे आहे वेळापत्रक

नोटीफिकेशन – 8 फेब्रुवारी

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 15 फेब्रुवारी

अर्जांची छाननी – 16 फेब्रुवारी

अर्ज मागे घेण्याची मुदत – 20 फेब्रुवारी

मतदान – 27 फेब्रुवारी (सकाळी 9 ते 4)

मतमोजणी – 27 फेब्रुवारी (सायंकाळी 5)

Rajya Sabha Election
Nitish Kumar News : भाजपसोबत जाताच नितीशकुमारांकडून लालूंना पहिला दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com