Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar news : देशाच्या राजकारणात खळबळ; नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपद सोडण्याचा धक्कादायक निर्णय, म्हणाले, नवे सरकार...

Bihar CM resigns, Nitish Kumar Rajya Sabha : मी तुम्हाला विश्वास देतो की, आपल्यासोबतचे माझे हे नाते भविष्यातही कायम राहील आणि आपण सर्वांसोबत मिळून विकसित बिहार घडवण्याचा संकल्प पुढेही कायम राहील, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.

Rajanand More

Bihar political news : मागील दोन दिवसांपासून बिहारच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यावर बोलण्यास कुणीही तयार नव्हते. अखेर त्यांनी स्वत:च आज याबाबत घोषणा करत चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे.

नितीश कुमार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपण आता मुख्यमंत्रिपदावर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसभेत जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कालच आमदारांची बैठक झाली होती.

नितीश कुमार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मागील दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावरील विश्वास कायम ठेवत आला आहात. त्याच बळावर आम्ही बिहारची आणि तुम्हा सर्व लोकांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. हा विश्वास आणि समर्थनाच्या बळावरच आज बिहार विकासाच्या मार्गावर आहे. यासाठी मी पूर्वीही अनेक वेळा आपले आभार मानले आहेत.

संसदीय जीवनाची सुरुवात करतानाच माझ्या मनात एक इच्छा होती की, बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांबरोबरच संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य बनता यावे. त्या अनुषंगाने यावेळी होत असलेल्या निवडणुकीत माजी राज्यसभेचा सदस्य होण्याची इच्छा आहे, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

मी तुम्हाला विश्वास देतो की, आपल्यासोबतचे माझे हे नाते भविष्यातही कायम राहील आणि आपण सर्वांसोबत मिळून विकसित बिहार घडवण्याचा संकल्प पुढेही कायम राहील. नव्या सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील, असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते लवकरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT