Nitish Kumar and Sanjay Jha Sarkarnama
देश

NitishKumar and Sanjay Jha : नितीशकुमारांची मोठी खेळी,भाजपातून आलेल्या नेत्याकडेच दिलं 'JDU'चं थेट कार्यकारी अध्यक्षपद!

Mayur Ratnaparkhe

JDU working president Sanjay Jha News : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. पक्षाचे नेते संजय झा यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिल्लीत पार पडलेल्या पक्ष बैठकीत हा निर्णय घेतला गेला.

या बैठकीस मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. संजय झा यांच्या निवडीबाबत आधीच अंदाज वर्तवला जात होता. या बैठकीतच नितीश कुमार यांनी संजय झा यांना जदयूची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.

जनता दल यूनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर संजय झा यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, आपले नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री नितीश कुमार(NitishKumar) यांनी मला मोठी जबाबदारी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे. नितीश कुमारांनी बिहारला बदललं आहे.

संजय कुमार झा(Sanjay Jha) हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जवळचे नेते मानले जातात. त्यांनी बिहार सरकारमध्ये जलसंपदा आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे मंत्री म्हणून काम केले आहे. याशिवाय ते बिहार विधानपरिषदेचे सदस्यही होते. फेब्रुवारी 2024मध्ये ते बिहारमधून बशिष्ठ नारायण सिंह यांच्या जागेवर जनता दल यूनायटेडकडून बिनविरोध राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेले होते.

याशिवाय संजय झा हे आधी भाजपमध्ये होते. तिथे ते विधानपरिषद सदस्यही होते. 2014मध्ये त्यांनी दरभंगा येथून लोकसभा निवडणूक लढवल होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. यानंतर 2019मध्येही भाजपला ही जागा गेल्याने त्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली होती, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नव्हती.

याआधी ललन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी स्वत:च राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली होती, आता विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने त्यांनी ही जबाबदारी आपले विश्वासू संजय झा यांच्यावर सोपवली आहे. आता संजय झा यांच्यावर देशभऱात जदयूच्या संचलनाची जबाबदारी असणार आहे.

(Edited by )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT