Nitish Kumar : सर्वात मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

CM Nitish Kumar Health Update : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री आणि एनडीए सरकामधील जदयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली असून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

CM Nitish Kumar Health Update : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री आणि एनडीए सरकामधील जदयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली असून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते सध्या मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी आराम केला नव्हता. शिवाय प्रचारासाठीच्या धावपळीमुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे.

शनिवारी (ता.15 जून) रोजी सकाळी नितीश कुमार यांचा हात दुखू लागला म्हणून ते मेदांता रुग्णालयात दाखल झाले. नितीश कुमार यांचे दैनंदिन कार्यक्रमात मागील काही दिवसांपासून वाढ झाली होती.

त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक प्रचार दौरे केले होते. तर दिल्लीत एनडीए सरकार स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाडी करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या सर्व कारणामुळे नितीश (Nitish Kumar) यांनी पुरेसा आराम केला नाही आणि त्यांमुळेच त्यांची तब्येत खालावली होती.

देशात 'अब की बार चोरसो पार'चा नारा देणाऱ्या भाजपच्या (BJP) वाट्याला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेसाठी आपल्या मित्रपक्षांची नितांत गरज होती. या काळात आधीपासूनच एनडीएचे घटकपक्ष असणाऱ्या जदयूचे सर्वेसर्वा नीतीश कुमार यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Nitish Kumar
Sharad Pawar : ...म्हणून शरद पवारांनी मानले मोदींचे आभार

तर सरकार स्थापनेसाठीच्या सर्व वाटाघाटी सुरु असताना नीतीश यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि निकालानंतरही त्यांना आरामासाठी वेळ मिळाला नव्हता. अशातच त्यांचा हात अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com