Bihar Politics : बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महागठबंधन पक्षांमध्ये आता धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता काँग्रेसला धक्का दिला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावरून त्यांनी काँग्रेस नेत्यांना डावलल्याचे बोलेले जाते.आता फक्त उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच (Tejasvi Yadav) याबद्दल भाष्य करतील, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
अशी असतानाही तेजस्वी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचबाबत उफाळून आलेल्या अंतर्गत धुसफूचे खंडन केले आहे. तर काँग्रेसने दावा केला आहे की, नितीश यांच्याशी बोलणे झाले असून, पक्षाच्या कोट्यातून दोन नवीन मंत्र्यांची नियुक्ती करण्यास सहमती दर्शवली आहे. एकूणच यावरून महागठबंधनमध्ये गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषेदेत, संवाद साधताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे का ? आणि काँग्रेस दोन मंत्रिपदांची मागणी करत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नितीश म्हणाले की, "तुम्ही याबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारा. कोणाच्या बाजूने किती पदे असतील ते यावर बोलतील.
समाधान यात्रेनंतर मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसचा दावा
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी शनिवारी सांगितले की, मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी बोललो आहे. समाधान यात्रा संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसचे काय होणार?
मागच्या महिन्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. काँग्रेसच्या कोट्यातून नवीन मंत्री केले जातील आणि आरजेडीची रिक्त पदेसु्द्धा भरले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण, 2 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या मागणीवर महागठबंधनमध्ये सामील असलेल्या पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. सध्या मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. या मुद्द्यावरून महागठबंधनमध्ये मोठे संघर्ष होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.