Laluprasad Yadav News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी.... लालूंच्या प्रकृतीबाबत मुलीने दिली महत्वपूर्ण अपडेट

आपल्या सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट लालूप्रसाद यांच्या प्रकृतीबाबत आहे.
Lalu Prasad Yadav-Rohini Acharya
Lalu Prasad Yadav-Rohini AcharyaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (LaluPrasad Yadav) यांच्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर लालूप्रसाद आज भारतात परतले आहेत. मात्र, त्यांची कन्या रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी यादव यांच्या प्रकृतीबाबत सावध भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लालू यांना कमी लोकांनी भेटावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (Lalu's daughter gave an important update on his condition)

रोहिणी आचार्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्या सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट लालूप्रसाद यांच्या प्रकृतीबाबत आहे. संसर्गापासून वडिलांना वाचवायचे आहे. जादा लोकांना भेटण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. जे कोणी लालू यांना भेटणार आहेत, त्यांनाही आपल्या तोंडाला मास्क लावावा लागणार आहे. लालूप्रसादही ज्यांना कोणाला भेटतील, त्यावेळी त्यांनी मास्क परिधान करणे गरजेचे आहे. त्यामुळे लालूंच्या चाहत्यांना न भेटण्याचे आवाहन त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केले.

Lalu Prasad Yadav-Rohini Acharya
BJP News : शिवसेनेच्या ‘त्या २० टक्के’ मतांसाठी भाजपचे आक्रमक डावपेच : कार्यकारिणीत ठरली रणनीती

लालूप्रसाद यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यामुळे पुढील काही दिवस त्यांना कुठल्याही संसर्गाची बाधा होणार नाही, याची काळजी आम्ही कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांना घ्यायची आहे. त्यामुळे लालूप्रसाद यांना भेटण्यासाठी सर्वच लोकांना परवानगी मिळणार नाही. जे भेटतील तेही मास्क परिधान करून पुरेपूर काळजी घेऊनच भेटतील, असेही रोहिणी यांनी म्हटले आहे.

Lalu Prasad Yadav-Rohini Acharya
Pawar On AjitDada : अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे भाष्य....

दरम्यान, तुम्हा सर्वांचे लालूप्रसाद यांच्यावर मोठे प्रेम आहे. आमच्याकडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की, लालूजींना भेटाल, तेव्हा तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. भेटायला याल तेव्हा सर्वांनी तोंडावर मास्क लावावा आणि लालूप्रसाद यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्हाला मदत कराल, अशी अपेक्षा लालू यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com