Narendra Modi, Atal Bihari Vajpeyi, Padit Javaharlal Neharu Sarkarnama
देश

No Motion Confidence : अविश्वास प्रस्तावाची नेमकी प्रक्रिया काय ? 'या' सरकारांचा गेलाय बळी !

Congress Vs BJP On Manipur In Parliament : यापूर्वी आलेल्या अविश्वास प्रस्तावाचा अनेक सरकारला फटका

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यासाठी अविश्वास ठरावाचे शस्त्र उपसले आहे. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला असून त्यास लोकसभेतही मंजूर झाला. केंद्र सरकारविरोधात आलेल्या या अविश्वास प्रस्तावाची चर्चा देशभर सुरू आहे. परिणामी अविश्वास ठरावाची प्रक्रिया काय असते आणि यापूर्वी कुणाच्या सरकारविरोधात असा प्रस्ताव आणला गेला होता का, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. (Latest Political News)

संसदेत पाचव्या दिवशीही मणिपूर विषयावरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर विरोधक नियम २६७ अन्वये चर्चेच्या मागणीवर ठाम आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळताना बुधवारी (दि. २६) सांगितले, "नियम १७६ अन्वये चर्चेचा प्रस्ताव आधीच स्वीकारला आहे." दरम्यान, विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत थांबवावे लागले.

अविश्वासाच्या प्रस्तावाची प्रक्रिया

लोकसभेच्या नियमांनुसार अविश्वास प्रस्ताव आणला जातो. लोकसभेच्या नियम 198(1) आणि 198(5) अंतर्गत, सभापतींनी बोलावल्यानंतरच ते सादर केले जाऊ शकते. तो सभागृहात आणण्याची माहिती सकाळी १० वाजेपर्यंत महासचिवांना लेखी द्यावी लागते. त्यासाठी सभागृहातील किमान ५० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. प्रस्ताव मंजूर झाल्यास, अध्यक्ष चर्चेसाठी एक किंवा अधिक दिवस निश्चित करतात. भारताचे राष्ट्रपतीही सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. सरकार तसे करू शकले नाही तर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अन्यथा ते बरखास्त केले जाते.

मागील सरकारांवर अविश्वास प्रस्तावाचा प्रभाव

सरकारचा निषेध म्हणून अविश्वास प्रस्तावाचा यापूर्वी वापर केला गेला आहे. विशेषत: जेव्हा युतीची सरकारे स्थापन होऊ लागली तेव्हा सरकार पाडण्यात ते महत्त्वाचे ठरले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून २०१८ मध्ये नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी या प्रस्तावाला तोंड दिले आहे. यातून काही सरकार वाचले तर मोरारजी देसाई, चरणसिंग, व्ही.पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अविश्वास प्रस्तावामुळे पडलेली आहेत. २०१८ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारविरोधात आलेला शेवटचा अविश्वास प्रस्ताव १९९ मतांनी पराभूत झाला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT