NO Confidence Motion : मोदी सरकारविरोधातल्या 'अविश्वासाला' अध्यक्षांची अखेर परवानगी; कधी येणार प्रस्ताव ?

NO Confidence Motion Against Modi Government : "कोणताही सदस्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतो."
NO Confidence Motion :
NO Confidence Motion :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. हिंसाचार आणि महिला अत्याचाराबाबतचा मु्द्दा संसदेत गाजत आहे. या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांमध्ये अभूतपुर्व एकी दिसून आली. (Latest Marathi News)

केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर चर्चा करण्यावर तयारी दाखवण्यात येत नव्हती. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखेर या मागणीला परवानगी दिली आहे. (NO Confidence Motion Against Modi Government)

NO Confidence Motion :
Supriya Sule On Manipur : मणिपूरवरून सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारची इभ्रतच काढली

मणिपूर हिंसाचारामुळे देशभरात संतापाची लाट आहे. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान मोदी यावर निवदेन देतील अशी विरोधी पक्षांना आशा होती. अविश्वास प्रस्तावासंदर्भात काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते. कोणताही सदस्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. मात्र यासाठी ५० खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असते. या अविश्वास प्रस्तावाची तयारी काँग्रेसने केली होती. सरकार विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे.

NO Confidence Motion :
Sextortion Call To Minister : केंद्रीय मंत्र्यांना फसवण्यासाठी 'सेक्सचं जाळं'; कटातील दोघांना अटक!

या अविश्वास प्रस्तावाल मान्यता मिळणार का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर लोकसभा अध्यक्षांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता अध्यक्ष तारीख आणि वेळ एक ठराविक वेळ निश्चित करतील आणि अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com