Aadarsh shastri  Sarkarnama
देश

Lok Sabha Election News : दुसरं तिसरं कोणी नाही तर लालबहादूर शास्त्रींच्या नातवानेच सांगितल्या 'एनडीए'ला मिळणार किती जागा ?

Congress Vs Bjp : भाजपकडून 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात आहे तर यावेळेस काँग्रेसही बहुमत मिळणार असल्याचा दावा करीत असल्याने सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.

Sachin Waghmare

Dehli News : देशातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसला असून आता निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आता केवळ शेवटचा सातवा टप्पा शिल्लक राहील आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकाकडून लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार यावरून जॊरात रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

भाजपकडून 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात आहे तर यावेळेस काँग्रेसही (Congress) बहुमत मिळणार असल्याचा दावा करीत असल्याने सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे. (Lok Sbha Election News)

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींसह राजकीय विश्लेषक कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवित आहेत. त्यामुळे सध्या मोदी सरकार सत्तेत परत येईल का त्यांचा ‘अब की बार 400 पारचा’ नारा खरा होईल का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री (Adarsh Shastri) यांनी भाजपला केवळ इतक्या जागा मिळवेल, असा दावा केला आहे.

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री हे भारतीय राजकारणात नशीब आजमावत आहेत. यापूर्वी त्यांनी आपमधून (AAP) उमेदवारी केली. त्यांनी आपच्या आंदोलन काळात राजकारणात उडी घेतली. द्वारका विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. पण देशात लोकशाही असावी. हुकूमशाही नसावी असा नारा देणाऱ्या आपमध्येच लोकशाही नसल्याचा अनुभव आल्याने त्यांनी आप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एनडीएला मिळणार 200 ते 220 जागा

आदर्श शास्त्री यांच्या मते ‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपने दिला. पण हा नारा जनतेला रुचला नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडी विक्रमी जागांनी विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. तर एनडीएला 200-220 जागांवर समाधान मानावे लागेल असे स्पष्ट केले. भाजपवर मोठ्या प्रमाणात मतदार नाराज आहेत. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT