Congress vs BJP : कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. दरम्यान, काँग्रेसने सत्तेत आलो तर राज्यातील बजरंग दल आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालू, असे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्यावर भाजपने काँग्रेसविरोधात टीकेची झोड उठविली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील द्वेषपूर्ण राजकारणाविरोधात नोंदविलेल्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तसे जाहीर केल्याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले.
वीरप्पा मोईली (Veerappa Moili) यांनी काँग्रेसच्या (Congress) जाहीरनाम्यातील बजरंग दलाच्या विधानावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मोईली म्हणाले, "भाजप सतत सोयीचे आणि द्वेषपूर्ण राजकारण करीत आलेली आहे. आता भाजप सरदार वल्लभभाई पटेल यांची पूजा करते. मात्र त्यांना एके काळी सरदार वल्लभभाई पटेल यांनीच राष्ट्रीय स्वयं संघावर बंदी घातली होती. त्यानंतर जवाहलाल नेहरू यांनी ती बंदी उठवली होती, हे आता भाजपला आठवत नाही."
यावेळी त्यांनी आमचा बजरंग दलावर कुठल्याही प्रकारची बंदी घालण्याचा विचार नसल्याचे सांगितले. मोईली म्हणाले, "राज्यात आणि देशात द्वेषपूर्ण राजकारण सुरू असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने (High Court) नोंदविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख केला होता. मात्र आमचा बजरंग दलावर बंदी घालण्याचा कुठलाही हेतू नाही."
दरम्यान, मंगळुरू येथे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी भगवान हनुमानाची एका संघटनेशी तुलना करून भगवान हनुमानाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान हनुमानावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी."
वल्लभ यांनी समाजात फूट पाडणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. ते म्हणाले, बजरंगबलीचा अपमान करण्याचा अधिकार पंतप्रधानांना कोणीही दिलेला नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था आणि भगवान हनुमान यांच्यात तुलना केल्याबद्दल त्यांनी कन्नडिगांची माफी मागितली पाहिजे. तसेच समाजात फूट पाडणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.