Siddaramaiah Sarkarnama
देश

JDS : ''आगामी काही दिवसांत JDS भाजपमध्ये...'' सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Karnataka Chief Minister Siddaramaiah : जेडीएसने आपल्या नावातून सेक्युलर हा शब्द काढून टाकावा, असंही सिद्धरामय्या म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Karnataka Politics News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देवेगौडा यांच्या पक्षावर हल्लाबोल केला आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

याशिवाय सिद्धरामय्या म्हणाले की, जेडीएसने आपल्या नावातून सेक्युलर हा शब्द काढून टाकावा. येत्या काळात देशात राजकीय ध्रुवीकरण आणि मतांचे ध्रुवीकरण होणार असून, एका बाजूला जातीयवादी शक्ती आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची आपली योजना भाजप कधीही सोडणार नाही. देवेगौडा आणि कुटुंबीय त्यांच्यात सामील झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका कार्यक्रमाला संबोधित करताना सिद्धरामय्या म्हणाले की, JD(S) हा राजकीय पक्ष नाही, तर तो देवेगौडा आणि कुटुंबाचा पक्ष आहे. ही एक कौटुंबिक पार्टी आहे. उद्या JD(S) भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मला वाटते जोपर्यंत देवेगौडा आहेत, तोपर्यंत ते एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून राहतील आणि राजकीय कारणांमुळे विलीनीकरण होणार नाही. परंतु त्यानंतर त्यांचे विलीनीकरण होईल.

ते म्हणाले की, आजकाल जेडी(एस) नेते कुमारस्वामी भाजपपेक्षा काँग्रेस सरकारच्या विरोधात बोलत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या तुमाकुरू ग्रामीण मतदारसंघातील माजी JD(S) आमदार गौरी शंकर आणि दसराहल्लीचे माजी आमदार आर. मंजुनाथ यांचा काँग्रेसमध्ये समावेश झाल्यानंतर ते बोलत होते. आगामी काळात जेडी(एस) मधील आणखी लोक काँग्रेसमध्ये सामील होतील, असंही ते म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT