Himanta Sarma : प्रियांका गांधींनी ज्योतिरादित्य शिंदेंवर केलेल्या टीकेवरून हिमंता बिस्वा सरमा संतापले!

Priyanka Gandhi : ''प्रियंका गांधींच्या शब्दांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले की...'' असंही म्हणाले आहेत.
Himanta Sarma
Himanta SarmaSarkarnama
Published on
Updated on

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या त्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. ज्यात त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ग्वाल्हेर व चंबळच्या लोकांचा विश्वासघात केला आणि कौटुंबिक परंपरा पाळल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Himanta Sarma
Manoj Jarange News : ''ज्यांच्या तीन पिढ्या मराठा समाजाने मोठ्या केल्या तेच आज...'' ; मनोज जरांगेंचे टीकास्त्र!

सरमा म्हणाले की, गांधी कुटुंबाला विरोध करणे म्हणजे देशद्रोह नाही. तसेच माधवराव शिंदे यांच्यासाठी प्रियंका गांधींनी वापरलेल्या अपमानास्पद भाषेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

मुख्यमंत्री म्हणाले, "जेव्हा मी काँग्रेसशी निगडीत होतो, तेव्हा मी माधवरावांना खूप जवळून पाहिलं. मी त्यांना एक कर्तबगार लोकसेवक आणि काँग्रेस पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून पाहिलं. त्यांच्यासाठी असे अपशब्द बोलणं खूप दुःखद आहे.

Himanta Sarma
MP Election 2023 : गद्दार..., प्रियंका गांधींचा ज्योतिरादित्यांवर घणाघात; पार्टटाईम नेत्या म्हणत शिंदेंचा टोला

मुख्यमंत्री सरमा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणाले की, प्रियंका गांधींच्या शब्दांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले की गांधी कुटुंबाचा अहंकार आकाशापेक्षाही उंच आहे. हे घराणे स्वत:ला राजघराणे समजत असले तरी त्यांचा विरोध करणे हा देशद्रोह आहे असे नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com