Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee News : आता भाजपचा 'या' दोन राज्यातही पराभव होणार : ममता बॅनर्जींचं भाकीत!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : मी कर्नाटकातील मतदार आणि जनतेला मी सलाम करते. तसेच, कर्नाटकात निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनाही मी सलाम करते. कर्नाटकात भाजपचा झालेला पराभव हा २०२४ ची सुरुवात आहे. त्यामुळे आगामी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे भाकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. (Now BJP will be defeated in these two states too: Mamata Banerjee's prediction)

कर्नाटकातील काँग्रेसने तब्बल १३६ जाग जिंकत विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कुमारस्वामी यांच्या जेडीएसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळविता आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, मी कर्नाटकातील मतदार आणि जनतेला सलाम करते. तसेच, कर्नाटकात निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनाही मी सलाम करते. अगदी कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केलेली आहे. आगामी काळात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या दोन्ही राज्यांत भाजपचा पराभव होईल, असं मला वाटतं.

कर्नाटकातील भाजपचा पराभव ही २०२४ ची सुरुवात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला अगदी १०० जागा मिळतील, असं मला वाटत नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कर्नाटकातील विजयावर बोलताना ‘जनतेला देव-धर्माच्या नावावर राजकारण नको आहे. विकास हवा आहे. देव-धर्म ही तुमची वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर 'उपर वालेकी लाठी में आवाज नहीं होती', म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समाजाच्या सर्व घटकामधून पाठिंबा मिळालेला आहे. जपनतेचे प्रमुख मुद्दे रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच आहेत. कर्नाटकातील विजय हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT