Karnataka Result : कर्नाटकच्या निकालाने वाढविले शिवसेना-भाजप नेत्यांचे टेन्शन

कानडी नागरिकांनी भाजपला दिलेला झटका हा राज्यातील शिवसेना-भाजप नेत्यांना धडकी भरविणारा आणि चिंता वाढविणारा आहे
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कर्नाटकात काँग्रेसने तब्बल १३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने दिलेली ही सणसणीत चपराक मानली जात आहे. कारण, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार पाडून ऑपरेशन लोट्‌सच्या माध्यमातून भाजपने आपले सरकार बनविले होते. असेच सरकार महाराष्ट्रातही सत्तेवर आले आहे, त्यामुळे कानडी नागरिकांनी भाजपला दिलेला झटका हा राज्यातील शिवसेना-भाजप नेत्यांना धडकी भरविणारा आणि चिंता वाढविणारा आहे. जनतेला तोडफोडीचे राजकारण आवडत नसल्याचे हे पुन्हा आधोरेखित झाले आहे. (Karnataka Assembly result increased Shivsen-bjp Leader's tension)

कर्नाटकात (Karnataka) २०१८ च्या निवडणुकीत भाजपने (BJP) १०४ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ८०, तर ३७ जागा जेडीएसला मिळाल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल वजूभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना संख्याबळ न तपासताच सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, अवघ्या अडीच दिवसांत त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने (Congress) जेडीएसला पाठिंबा देत कुमारस्वामींचा राज्यभिषेक केला होता.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devdutt Nikam News : राष्ट्रवादीला आव्हान देत निवडून आलेल्या देवदत्त निकम यांचा वळसे पाटलांच्या हस्ते सत्कार

कुमारस्वामी हे २३ मे २०१८ ते २३ जुलै २०१९ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मात्र, मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर राहावे लागत असल्याने काँग्रेसचे आमदार अस्वस्थ होते. भाजप हा याच संधीचा वाटत पाहत होता. काँग्रेसच्या १३ आमदारांना ‘ऑपरेशन लोट्‌स’द्वारे भाजपने गळाला लावले होते. त्यांना आमदारांना राजीनामा द्यायला लावून येडियुरप्पा यांचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या हातात भाजपने कमान दिली होती. मात्र, हे तोडफोडीचे राजकारण जनतेच्या पसंतीला उतरले नसल्याचे दिसून आले आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
NCP NEWS : काँग्रेस करणार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घात : भाजपविरोधात निकराची लढाई

अगदी याचपद्धतीने भाजपने मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. राजस्थानमध्ये तो प्रयेाग यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, वर्षभरापूर्वी शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तेला गवसणी घातली आहे. शिवसेनेतील दोन नंबरचा नेता एकनाथ शिंदे यांना गळाला लावून अख्खी शिवसेनाच फोडण्याचे काम झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवत भाजपने आपले ईप्सित साध्य केले आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग

महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात पोटनिवडणूक वगळता एकही सार्वजनिक निवडणूक घेण्याचे धाडस दाखवलेले नाही. राज्यातीन बहुतांश जिल्हा परिषद, अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा बॅंकांची मुदत संपलेली आहे. त्यावर नेमण्यात आलेल्या प्रशासकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, सरकारने निवडणूक काही घेतलेली नाही. आता तर कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला बसलेला दणका राज्यातील शिंदे-फडणवीस यांची चिंता वाढवणारा आहे. या निकालाच चांगलाच धसका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com