Ajit Pawar & Karnataka C.M       Basavaraj Bommai Latest News
Ajit Pawar & Karnataka C.M Basavaraj Bommai Latest News Sarkarnama
देश

आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा-तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज (ता.२४ नोव्हेंबर) प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. (Ajit Pawar & Karnataka C.M Basavaraj Bommai Latest News)

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला. त्यावर बोलताना पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्यांच्या या वक्तव्याचा पवारांनी निषेध केला.

लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहिती. आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावला. तसेच, केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.

प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो.अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे.आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही शिर्डी येथे गेलो.पंढरपूर (Pandharpur) येथे गेलो तर दर्शन घेतो.आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावं आम्ही ऐकून हतबल झालो आहे, अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT