भाजपमध्ये अंतर्गत वाद? : 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् शेलारांमध्ये बेबनाव!'

Devendra Fadnavis News : काँग्रेस नेत्याच्या विधानावे राजकीय वर्तुळात चर्चा
Devendra Fadnavis, Ashish Shelar
Devendra Fadnavis, Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जात होते. मात्र, आज काँग्रेसच्या नेत्यांने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात बेबनाव असल्याचे म्हटले असल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

''राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्यात बेबनाव असल्याचे दिसून येते. सदर माहिती शेलार यांना त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकते. राज्यात भाजपा ची सत्ता आहे हे विसरले का? चुकीचे वर्तन झाले असल्यास पोलिसांवर कारवाई करणार की नाही याचे आधी उत्तर द्या.'' असे ट्वीट काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केल्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे. आता भाजपमध्येच (BJP) अंतर्गत मतभेद आहेत की काय? असा सवाल विचारला जात आहे.

Devendra Fadnavis, Ashish Shelar
Sharad Pawar News : ''...त्यामुळे दौरा सोडून हात दाखवायला मी कधीच ज्योतिषाकडे जात नाही!''; पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

आशिष शेलार यांनी बुधवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणावरून ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ठाकरे सरकार व पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर टीका केली होती. तो व्हिडिओ आज ट्वीट करत सावंत यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या व्हिडीओमध्ये शेलार काय म्हणाले होते?

श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० ला लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका आहे. तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज, असल्याचे शेलार यांनी म्हटले होते.

Devendra Fadnavis, Ashish Shelar
Udayanraje Bhosale : पवार, गडकरींनी कोश्यारींवर तेव्हा आक्षेप का घेतला नाही ; उदयनराजेंचा सवाल

तत्कालीन पोलीस आणि सरकारने कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे', अशी मागणी शेलार यांनी केली होती. त्यावरुन सावंत यांनी शेलार यांना टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com