देश

Jensen Huang controversy : मोठी खळबळ! Nvidia CEO जेनसन हुआंग यांचे दुसरे अफेअरही आले समोर; 'हनीट्रॅप' अन् चिनी हेरगिरीच्या विळख्यात कसे अडकले?

Nvidia CEO Jensen Huang controversy : Nvidia CEO जेनसन हुआंग यांच्याबाबत कथित अफेअर, हनीट्रॅप आणि चिनी हेरगिरीच्या आरोपांची चर्चा सुरू आहे. नेमके प्रकरण काय, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Rashmi Mane

जगातील आघाडीची AI चिप निर्माती कंपनी Nvidia चे CEO जेनसन हुआंग सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्याची आणि चीनशी संबंधित कथित हेरगिरी प्रकरणाची जगभरात चर्चा सुरू आहे. आधी एलिस हुआंग या चिनी व्यावसायिक महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांची माहिती समोर आली. आता Nvidia मधील वरिष्ठ अधिकारी किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबतही अफेअर असल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Nvidia च्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल आणि जेनसन हुआंग यांच्यात जवळचे संबंध होते. कंपनीतील 5 माजी कर्मचाऱ्यांनी हा दावा करण्यात आला आहे. मार्चमध्ये सॅन जोस येथे झालेल्या Nvidia च्या परिषदेदरम्यान दोघेही एका हॉटेलमध्ये जवळीक साधताना दिसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या वृत्ताला जेनसन हुआंग, Nvidia किंवा किम्बर्ली पॉवेल यांनी दुजोरा दिलेला नाही.

याआधी एलिस हुआंग यांच्यासोबतच्या संबंधांमुळे जेनसन हुआंग वादात सापडले होते. एलिस या सिंगापूरमधील Megaspeed International या कंपनीच्या माजी वरिष्ठ अधिकारी होत्या. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना त्या चीनसाठी माहिती गोळा करत असल्याचा संशय असल्याचे वृत्त समोर आले.

याच पार्श्वभूमीवर जेनसन यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून Nvidia ची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या हेरगिरीच्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

या वादानंतर जेनसन यांनी पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशातून दिली. त्यांनी कुटुंबीयांची आणि कर्मचाऱ्यांची माफीही मागितली. त्यानंतर Nvidia च्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. जेनसन हुआंग यांच्या CEO पदाबाबतही संचालक मंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या अफेअरच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचे वृत्त आहे.

SCROLL FOR NEXT