राजकारणात खळबळ! विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी मैदानात; मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब?

Asaduddin Owaisi Chandrashekhar Azad alliance : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 पूर्वी असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी सामाजिक परिवर्तन मोर्चाची घोषणा केली. या नव्या राजकीय आघाडीचे स्वरूप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत जाणून घ्या.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेशच्या राजकारणात 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधीच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी एकत्र येत 'सामाजिक परिवर्तन मोर्चा'ची घोषणा केली आहे. या नव्या राजकीय आघाडीमुळे उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर करण्यात आला आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी संयुक्तपणे या आघाडीची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सामाजिक परिवर्तन मोर्चा सक्षम पर्याय ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Asaduddin Owaisi
NMC Politics: नाशिक महापालिकेत नवा पायंडा; विरोधी पक्षनेतेपदी प्रथमेश गीते, तर सभागृह नेतेपदी अजिंक्य साने यांची वर्णी!

यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी या आघाडीला तिसरी आघाडी म्हणण्याऐवजी पहिली मजबूत आघाडी असल्याचे म्हटले. यापूर्वी मोठ्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आपल्याला कमकुवत समजण्यात आले. आता अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच भाजपचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही सामाजिक परिवर्तन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या घोषणेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार. असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद हेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आझाद यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओवैसी यांनी यावेळी सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दाही उपस्थित केला. आतापर्यंत काही समाजांचा केवळ मतांसाठी वापर करण्यात आला, मात्र त्यांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Asaduddin Owaisi
TOP 10 News : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याची एक्झिट; वाचा महत्त्वाच्या बातम्या

विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा या मोर्चाने केली आहे.

आता या नव्या आघाडीला इतर पक्षांचा पाठिंबा मिळणार का, भाजप आणि समाजवादी पक्षासमोर ती किती मोठे आव्हान उभे करणार आणि निवडणुकीत मतांचे समीकरण कसे बदलणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.