Naba Das, Indira Gandhi
Naba Das, Indira Gandhi sarkarnama
देश

Naba Das News : 'या' घटनेनं झाली इंदिरा गांधींच्या हत्येची आठवण..

सरकारनामा ब्युरो

Odisha Health Minister Attack Naba Das News :ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास (odisha health minister naba das) यांच्यावर आज दुपारी जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या आहेत.

हल्लेखोर फरार आहे. या घटनेत मोठी अपडेट समोर येत आहे. दास यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.नाबा दास गाडीततून उतरताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

"आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर गोळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असणारे एएसआय गोपाळ दास यांनी झाडली आहे. गोपाल दास यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या आहेत. नाबा दास गाडीततून उतरताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे," असे पोलिस सुत्रांनी सांगितले. गोपाळ दास हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नाबा दास यांच्यावर सध्या भुवनेश्वर येथे उपचार सुरु आहेत.

राजकीय नेत्याच्या सुरक्षारक्षकानेच गोळ्या झाडल्याच्या या घटनेमुळे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची आठवण आजच्या घटनेने पुन्हा झाली. ३१ आँक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्यावर त्यांचे सुरक्षारक्षक सतवंत सिंह आणि बेअंत सिंह यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता.

नाबा दास हे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारात ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. ते कारमधून उतरत असताना त्यांच्या सुरक्षासाठी तैनात असलेल्या ASI गोपाळ दास याने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या.

नाबा दास यांच्या छातीत ४ ते ५ गोळ्या लागल्याचे सुत्रांनी सांगितले. ते या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असताना हा प्रकार झाल्याने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शनि शिंगणापूरमुळे नाबा दास पहिल्यांदा चर्चेत..

या प्रकरणाचा तपास ओडिशा गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही दुर्भाग्यपूर्ण घटना असल्याचे म्हटलं आहे. नाबा दास हे पहिले काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते बीजू जनता दलात सामील झाले. नवीन पटनायक यांनी त्यांच्यावर आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. शनि शिंगणापूर मंदिराला १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीपासून तयार केलेला कलश दान करणारे नाबा दास हे पहिल्यांदा चर्चेत आले होते.

कोण आहेत नब किशोर दास..

  • 2004 मध्ये नाबा दास यांनी ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

  • त्यांनी 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

  • 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

  • 2015 साली विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते.

  • नाबा दास हे ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT