Rajiv Kumar Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 Results : मतदारांनी केला विश्वविक्रम; निवडणूक आयुक्तांकडून स्टँडिंग ‘ओव्हेशन’

Chief Election Commissioner Rajiv Kumar Lok Sabha Election Result Update : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी लोकसभा निवणुकीच्या एक दिवस आधी मतदारांचे आभार मानले.

Rajanand More

Election 2024 Update : लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊ ठेपला आहे. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत भारतीय मतदारांच्या आभार मानले आहेत. निवडणुकीच्या मतदानात मतदारांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे स्वत: निवडणूक आयुक्तांनी उभे राहून मतदारांचे कौतुक केले.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सोमवारी (ता. ३) सात टप्प्यांतील मतदान प्रक्रियेसह निकालाच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक पार पाडणं हा चमत्कार होता. तब्बल 64 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हा विश्वविक्रम आहे.

जगात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही, कधीही मतदान झालेले नाही, असे सांगत निवडणूक आयुक्तांनी मतदारांना उभे राहून सलाम केला. महिला मतदारांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. तब्बल 31.4 कोटी महिलांनी मतदान केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील मतदानाची टक्केवारी मागील चार दशकांहून अधिक होती. मागील निवडणुकीत 540 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावे लागले होते. यावेळी हा आकडा केवळ 39 एवढाच आहे. त्यापैकी 25 केंद्र ही दोन राज्यांतील आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

देशात तब्बल 97 कोटी मतदार होते, त्यापैकी 64 कोटींहून अधिक मतदारांनी मतदान केले. देशभरात 10 लाखांहून अधिक मतदान केंद्र आणि दीड कोटीहून अधिक कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. पहिल्यांदाच 85 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मतदारांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.

मनी पॉवरला लगाम

निवडणुकीच्या काळात पैशांचा वापर कमी व्हावा, यासाठी आयोगाच्या यंत्रणेने देशभरात तब्बल 10 हजार कोटींहून अधिक रोख रक्कम, मद्य, वस्तू, ड्रग्ज जप्त केले. मागील वर्षी हा आकडा केवळ 3 हजार 475 कोटी होता. यंदा 1 हजार 54 कोटी रुपयांची रोख रक्कम होती. तर 2 हजार 198 कोटी रुपयांच्या विविध वस्तू आहे 898 कोटी किंमतीचे मद्यही जप्त करण्यात आले, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT