Lok Sabha Elections 2024: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर? काँग्रेस अँक्शन मोडमध्ये

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi Likely to Become Prime Minister Third Term Congress on Action Mode : मोदी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक मारणार यामुळे स्वत: मोदी नक्कीच खूश असणार, पण चारसो पार करण्याचा जो विक्रम करायचा होता, तो मात्र हुकताना दिसत आहे.
Lok Sabha elections 2024 Result
Lok Sabha elections 2024 ResultSarkarnama
Published on
Updated on

Exit Poll 2024 News: लोकसभेच्या निकालाआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलवरून नरेंद्र मोदी (Narendra Modi)तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील हे स्पष्ट झाले आहे. तर राहुल गांधी यांनी काँग्रेसला २९५ जागा मिळतील, असे ठामपणे सांगितले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)आणि नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार; तसेच राज्यातील विधिमंडळ पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष यांची नुकतीच बैठक घेतली. 'इंडिया' आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला होता.

मतदानाच्या दिवशी फेरफार होऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याने सावध राहा, अशा सूचना खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.'मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष पूर्णपणे बोगस आहेत,' अशी टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

शनिवारी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठे बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना मतमोजणीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे.

मोदी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक मारणार यामुळे स्वत: मोदी नक्कीच खूश असणार, पण चारसो पार करण्याचा जो विक्रम करायचा होता, तो मात्र हुकताना दिसत असल्याचे एक्झिट पोलवरून स्पष्ट झाले आहे.

Lok Sabha elections 2024 Result
Arun Gawli: 'डॅडी'ला रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट ; सुटकेनंतर गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या?

नरेंद्र मोदींचे सरकार जाणार याविषयी इंडिया आघाडीचे नेत्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आघाडीवर आहेत. इंडिया आघाडीच्या आगामी सरकारमधील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांना त्यांनी समर्थन देऊन टाकले होते. पण आता एक्झिट पोलनंतर राऊतांना आवाज मंदावलेला दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com