Arvind Kejriwal, Omar Abdullah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Delhi Election Results 2025 : "लढा आणि एकमेकांना संपवा..." दिल्ली विधानसभा निकालाची आकडेवारी समोर येताच ओमर अब्दुल्लांचा आप-काँग्रेसवर हल्लाबोल

Omar Abdullah on AAP and Congress : देशात इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या आप आणि काँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढवली. त्याचेच परिणाम आता सुरू असलेल्या मतमोजणीत पाहायला मिळत आहेत. कारण आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील 70 जागांपैकी भाजप 43 जागांवर तर आप 26 जागांवर आघाडीवर आहे.

Jagdish Patil

Delhi Assembly election 2025 news LIVE : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. 08) सकाळपासून सुरू आहे. 70 विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्ष (Aam Adami Party), भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली.

मात्र, देशात इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या आप आणि काँग्रेस पक्षाने दिल्ली (Delhi) विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढवली. त्याचेच परिणाम आता सुरू असलेल्या मतमोजणीत पाहायला मिळत आहेत. कारण आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील 70 जागांपैकी भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 26 जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेसला (Congress) मात्र दिल्लीत खातं देखील अद्याप उघडता आलेलं नाही. निकालाच्या याच आकडेवारीवरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. दिल्ली निवडणुकीच्या सध्याच्या कलांनुसार आप पिछाडीवर तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही.

मात्र, या निवडणुकीत काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं अशी चर्चा सध्या चालू आहे. याच मुद्द्यावरून ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, आपापसात आणखी लढा आणि एकमेकांना संपवा, असं म्हटलं आहे. यासाठी त्यांनी एका व्हायरल मीमचा वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. या मीममध्ये 'और लढो आपस मै' असा मजकूर आहे.

दरम्यान, आप आणि काँग्रेस लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीत एकत्र लढले होते. मात्र, दिल्ली विधानसभेत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी दिल्लीतील सर्व 70 जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले. मात्र, याचा फायदा भाजपला (BJP) झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT