
Solapur, 07 February : भारतीय जनता पक्षाकडून सध्या दीड कोटी सदस्य नोंदणीची मोहिम सुरू आहे. जो कोणी एक हजार सदस्य करेल, त्याला कॉम्युटर जनरेटेड पत्र जातं. कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपची ती एक कल्पना आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जागी शरद पवारसाहेबांनी जरी आमच्या पक्षाचे एक हजार सदस्य केले तर त्यांनाही भाजपकडून अभिनंदनाचे पत्र जाईल, असे विधान माढ्याचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे एक हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना अभिनंदन करणारे पत्र आले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने बोलताना माजी खासदार निंबाळकर यांनी हे विधान केले आहे. भाजपकडून सदस्य नोंदणीबाबत देण्यात येत असलेल्या त्या पत्रावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्कॅन केलेली सही आहे, ती काही त्यांची स्वतःची सही नाही, असा दावाही निंबाळकर यांनी केला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) म्हणाले, सदस्य नोंदणीबद्दल आलेल्या पत्राचा आधार घेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना फारसा काही फायदा होईल, असे मला तरी वाटत नाही. मोहिते पाटील कुटुंबीयांना भाजपबरोबर सातत्याने विश्वासघात केलेला आहे, त्यामुळे त्यांना पक्षातून मोकळं करून द्यावं, अशी लोकांची मागणी आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोकळा श्वास घेता येईल.
जी माणसं भाजप कार्यकर्त्यांना दमबाजी करत होती. राम सातपुतेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होती, त्याच लोकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी होते, अशी तेथील कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही माजी खासदारांनी म्हटले आहे.
मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम होणार
आमच्या पक्षश्रेष्ठीला तळगाळातील माहिती असते. आमच्या आणि सर्वसमान्यांच्या भावाना त्यांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर सर्वांचा करेक्ट कार्यक्रम होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या प्रकरणाचा योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, अशी आमची खात्री आहे, असेही रणजितसिंह निंबाळकर यांनी दावा केला आहे.
ईव्हीएमवर शंका म्हणजे लोकशाहीला तडा देण्यासारखे
आजही सरासरी ३० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्या लोकांच्या मनात पुन्हा शंका निर्माण करणे म्हणजे लोकशाहीला तडा देण्यासारखे आहे. ईव्हीएम मशीन कोणी हॅक केली तर माझी सर्व प्रॉपर्टी त्या व्यक्तीला लिहून देईन, असे सांगून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ईव्हीएमचे समर्थन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.