PM Modi Birthday Sarkarnama
देश

PM Modi Birthday : 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा; काँग्रेसकडून बेरोजगारीचा आकडा जाहीर

Pradeep Pendhare

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सत्ताधारी आणि विरोधांकडून अभिनंदनाचे संदेश दिले जात असतानाच काँग्रेसने टोमणा मारलाय.

देशातील बेरोजगार तरुण तुमचा वाढदिवस 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा करत आहेत. असे घडू नये यासाठी आपण रोजगारासाठी विकासाचं राजकारण करा, असा टोमणा काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी बेरोजगाराची आकडेवारीच जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज 74 व्या वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांना जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक देखील अभिनंदन करत आहेत. याचवेळी काँग्रेसने टायमिंग साधत 'राष्ट्रीय बेरोजगार दिना'ची आठवण करून दिली. राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव तथा खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, त्यांच्या राजकीय वाटचालीत रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याची आकडेवारीच मांडली.

दरवर्षी 1.2 कोटी नोकऱ्या उपलब्ध कराव्या लागणार

दरवर्षी देशात बेरोजगारांमध्ये 70 ते 80 लाख युवकांची भर पडते. 2012 आणि 2019 या काळात देशात रोजगारामध्ये 0.01 टक्के वाढ झाली. 2022 च्या आकडेवारीनुसार शहरी भागातील युवकांमध्ये 17.2 टक्के, तर ग्रामीण भागातील युवकांमध्ये 10.6 टक्के बेरोजगारी आहे. महिलांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण 21.6 टक्के आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी पुढील दहा वर्षे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 1.2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करून द्यावा लागतील. म्हणजेच, सात टक्के GDP दर देखील युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास पुरेसा ठरणार नाही. देशाचा GDP दर सध्या 5.8 टक्केच आहे, याकडं काँग्रेसचे (Congress) जयराम रमेश यांनी लक्ष वेधलं.

21 टक्के लोकांकडे नियमित उत्पन्न देणारी नोकरी

तसंच 2019-22 मध्ये औपचारिक रोजगार 10.5 टक्क्यावरून 9.7 टक्के झाला आहे. भारतात फक्त 21 टक्के लोकांकडे नियमित उत्पन्न देणारी नोकरी आहे. कोविडपूर्वी ती 24 टक्के होती. या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच कृषी श्रमिकांची संख्या वाढली आहे. आर्थिक आधुनिकीकरणात ही बाब योग्य नाही. एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्रातीत हिस्सेदारी 2019-22 मध्ये 42 टक्क्यावरून 45.4 टक्के झाली आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

बेरोजगार दिनाचे काका!

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी सोशल मीडियावर यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देव तुम्हाला आनंदी ठेवो, तुम्हाला दीर्घायुष्य आणि बुद्धी देवो, असं म्हटलं आहे. पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा शिक्षण दिन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा विद्यार्थी दिन, चौधरी चरणसिंग यांचा शेतकरी दिन, भारतरत्न डाॅ. बाबासाहेबांचा समता दिन म्हणून साजरा केला जातो. पण देशातील युवक तुमचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा का करावा लागतो? लोकांचे काही भले करा, नाहीतर तुमची आठवण, बेरोजगार दिनाचे काका! म्हणूनच होईल, असे टोला सुप्रिया श्रीनेट यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT