Navi Delhi News, 16 Sep : लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 'अब की बार चारसो पार'चा नारा दिला होता. मात्र, त्यांच्या या घोषणेला अपक्षेत असं यश मिळालं नाही. कारण निवडणुच्या निकालात भाजपच्या वाट्याला 240 जागा आल्या.
त्यामुळे 400 पार करणं लांबंच पण आधीच्या निवडणुकीत मिळालेल्या 303 जागांवरून पक्ष थेट 240 जागांवर आला. तर पक्षाच्या या अपयशाचं कारण आता भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणारा प्रचार केला आणि त्या प्रचाराला लोक फसले. विरोधकांच्या याच प्रचार मोहिमेमुळे जनतेची दिशाभूल झाली."
तसंच, पूर्ण बहुमत मिळाल्यास भाजप (BJP) संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप विरोधकांनी केला, याचा मागासवर्गीय समाजावर परिणाम झाला. शिवाय आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी जे चांगली काम करण्याचा प्रयत्न करत आहे, ती कामंही शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगितलं गेलं, या सर्वाचा फटका निवडणुकीत बसल्याचं गडकरी म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी संभ्रम पसरवल्यानंतरही भाजप सत्तेत आहे. तर लोकसभा निवडणुकीत भारताचा विजय झाल्याचंही म्हणत आगामी 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप 100 टक्के जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.