Donald Trump, Benjamin Netanyahu Sarkarnama
देश

Donald Trump: ट्रम्प यांची एक फाईट, वातावरण टाईट! युद्धबंदीचा आदेश धुडकावणाऱ्या इस्रायलला अमेरिकेनं एकाच वाक्यात केलं गप्पगार

Donald Trump: इराण-अमेरिका युद्धबंदी झाली तरी इस्रायलचा मात्र तोरा मात्र अद्याप शांत झालेला नाही, यावरुनच आता ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना चांगलंच सुनावलं आहे.

Amit Ujagare

Donald Trump: इराण-अमेरिका युद्धबंदी झाली तरी इस्रायलचा मात्र तोरा मात्र अद्याप कायम असून, आम्ही युद्धबंदी केलेली नाही असं या देशानं म्हणताच ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना चांगलंच सुनावलं आहे. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या G-7 शिखर परिषदेत एका बैठकीत इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी इस्रायलला सुनावलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं की, इराणसोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यापूर्वी दोन तास आधी इस्रायलकडून बेरुतवर करण्यात आलेल्या हल्ला आम्हाला रुचलेला नाही. मी त्यांना हे स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की हे आम्हाला पटलेलं नाही. मतभेद असले तरी ट्र्म्प यांना विचारण्यात आलं होतं की, इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमधील करार कायम राहिल का? त्यावर ट्रम्प यांनी आत्मविश्वासानं होय असं उत्तर दिलं.

अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्वच नाही - ट्रम्प

लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर ट्रम्प यांनी म्हटलं की, मी याला एक छोटसं युद्ध मानतो, इराण हा एक मोठा मुद्दा आहे. पण तिथं एक थोडासा धोकाही आहे जो वारंवार डोकं वर काढत आहे आणि तो आहे हिजबुल्लाह. यावेळी इस्रायलच्या सुरक्षा धोरणात अमेरिकेची भूमिका स्पष्ट करताना ट्रम्प यांनी म्हटलं की, अमेरिकेशिवाय इस्रायलचं कोणतंही अस्तित्व नाही. कारण अमेरिकेचा कुठलाही राष्ट्राध्यक्ष हे करायला तयार नव्हता जे मी इस्रायलसाठी केलं आहे. नेत्यानाहू यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत पण लेबनॉनबाबत त्यांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT