Law Commission opinion 2025 : देशात लोकसभा व सर्व राज्यातील विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. ‘वन नेशन-वन इलेक्शन’शी संबंधित विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीसमोर २३ व्या विधी आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार लोकसभा व विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ बदलला जाऊ शकतो, असे आयोगाने सांगितले आहे.
संसदेकडून घटनेत बदल करून हा कार्यकाल बदलला जाऊ शकतो, असे आयोगाने जेपीसीसमोर आपले म्हणणे मांडले आहे. याबाबत ४ डिसेंबरला आयोगाकडून जेपीसीसमोर सादरीकरण केले जाणार आहे. त्याआधी आयोगाने जेपीसीला सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्ये कार्यकाळ बदलाबाबत माहिती दिल्याचे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले आहे. सध्याच्या जेपीसीच्या प्रक्रियेत विधी आयोगाची ही भूमिका महत्वाची मानली जात आहे.
विधी आयोगाने म्हटले आहे की, सध्याच्या कायद्यांनुसार लोकसभा किंवा विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकत नाही. पण घटनादुरूस्तीच्या माध्यमातून संसद हे काम करू शकते. प्रस्तावित विधेयकातही हीच प्रक्रिया आहे. घटनेत आधीपासूनच कालावधीत बदलबाबतच्या शक्यतेवर भाष्य आहे. कालावधी पूर्ण होण्याआधीच संसद बरखास्त करणे किंवा आपत्कालीन स्थितीत कार्यकाळ वाढविणे, आदी नमूद आहे. त्यामुळे पाच वर्षांचा कालावधी अपरिवर्तनीय आहे किंवा बदला येणार नाही, असे अजिबात नाही.
घटनेतील कलम ८३ आणि १७२ मध्ये निश्चित करण्यात आलेला कालावधी हा अपरिवर्तनीय तरतूद नाही. मोठ्या राष्ट्रीय हितासाठी त्यात बदल केला जाऊ शकतो, असा तर्क विधी आयोगाने दिला आहे. एकाचवेळी निवडणूक घेतल्याने जनता, सरकार आणि प्रशासनाचा वेळ आणि संसाधनांचीही बचत होईल. एकावेळी निवडणुकीमुळे लोकशाही अधिकारांवर काही परिणाम होणार नाही. मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा पूर्ण अधिकार असेल. केवळ सर्व निवडणुका एकाचवेळी होतील, या बदलामुळे घटनेच्या मुळे संरचनेला धक्का पोहोचत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
वन नेशन, वन इलेक्शनमुळे लोकशाही कमजोर नव्हे तर अधिक मजबूत होईल. कारण राज्यांमधील सरकारे स्थिर असतील, धोरणांवर लक्ष केंद्रित करता येईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला जे अतिरिक्त अधिकार मिळतील, ते सध्याच्या अधिकारांचाच विस्तार असेल, असेही विधी आयोगाने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.