Kapil Sibal, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Kapil Sibal On Rahul Gandhi : ...तरच राहुल गांधींची खासदारकी टिकू शकते; कपील सिब्बलांनी सांगितला मार्ग

Rahul Gandhi's Disqualification As MP : राहुल गांधींवरील कारवाई काँग्रेससाठी मोठा धक्का

सरकारनामा ब्युरो

Congress News : गुजरातमधील सूरत न्यायालयाने २०१९ च्या मानहानीच्या प्रकरणात काँग्रेसनेते राहुल गांधी यांना दोषी ठरवून गुरुवारी (ता. २३) दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यापुढे संसदेचे सदस्य नाहीत, असे लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी (ता. २४) जाहीर केले. यावर काही कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाली त्याचवेळी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघ अपोआप रिक्त झाला आहे.

राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच निर्णयावर अपील करण्यासाठी त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे कायद्यानुसार राहुल गांधींच्या खासदारकीवर आपोआप अपात्रतेचा धोका निर्माण झाल्याचेही काही विधीज्ञांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, दोषी ठरलेल्या आणि कमीत कमी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली व्यक्ती अपात्र ठरवली जाईल आणि पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी तशीच राहील. याचा अर्थ असा की, त्यांच्या तुरुंगवासाच्या व्यतिरिक्त, गांधी पुढील सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. हा राहुल गांधीसह काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, माजी मंत्री व ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल (Kapil Sibal) यांनी मात्र राहुल गांधींना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे.

'सर्व चोरांना मोदी आडनाव कसे आहे', या २०१९ मधील वक्तव्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिली. त्यावर ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी प्रक्रिया आणि निकाल विचित्र असल्याची टिप्पणी केली. कपिल सिब्बल म्हणाले, "राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर केला जातो. राहुल गांधी यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी आहे. त्या कालावधीसाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. या निकालाने 'ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारच्या अनाठायी कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले."

आज लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यापुढे संसदेचे सदस्य राहणार नाहीत, असा आदेश दिला. कालच्या सूरत न्यायालयाचा निकाल आणि आजच्या लोकसभेतील निर्णय म्हणजे राहुल गांधींसह काँग्रेसला (Congress) मोठा धक्का मानला जात आहे. राहुल गांधींची खासदारकी सूरत न्यायालयाच्या निकाल लागला त्याचवेळी धोक्यात आल्याचे सांगून सिब्बल यांनी गांधींची खासदारकी वाचविण्याचा एक मार्गही सांगितला. सिब्बल म्हणाले, "न्यायालयाने शिक्षेला केवळ स्थगिती देणे पुरेसे नसते. दोषी ठरविण्यास स्थगिती असणे आवश्यक होते. आता शिक्षेला स्थगिती दिली तरच राहुल गांधी खासदार राहतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT