Rahul Gandhi and Priyanka Gandhi
Rahul Gandhi and Priyanka GandhiSarkarnama

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधींचं भावनिक ट्विट; म्हणाल्या...

Priyanka Gandhi : ''कधीच झुकलो नाही आणि झुकणार नाही. तुम्ही काहीही करा..''
Published on

Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टिप्पणी काँग्रेस नेते राहुल गांधींना चांगलीच भोवली आहे. या प्रकरणी सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भावनिक ट्विट केलं आहे. तसेच ट्विटच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला. ''गांधी कुटुंबियांच्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहत आहे त्याची एक खासियत आहे'', अशा शब्दांत भाजपला सुनावलं.

काय आहे प्रियांका गांधीचं ट्विट?

''तुम्ही माझ्या कुटुंबाला घराणेशाही म्हणता, तर तुम्ह एक लक्षात ठेवा याच कुटुंबानं भारताच्या लोकशाहीला आपलं रक्त आटवून जिवंत ठेवलं आहे. जी लोकशाही तुम्ही संपवायचा प्रयत्न करत आहात. याच कुटुंबानं भारताचा आवाज वाढवला आहे.

तसेच आमच्या पूर्वजांनी सत्याची लढाई लढली आहे. आमच्या धमन्यांमध्ये जे रक्त खेळतंय त्याची एक खासियत आहे. तुमच्यासारख्या भित्र्या, सत्तालोभी आणि हुकूमशाहसमोर कधीच झुकलो नाही आणि झुकणार नाही. तुम्ही काहीही करा," असं ट्विट करत प्रियांका गांधींनी भाजपला सुनावलं आहे.

खासदारी का रद्द झाली?

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

त्यानंतर लगेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यानंतर काँग्रेसला मोठा धक्का धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com