Rahul Gandhi Sarkarnama
देश

Operation Blue Star : काँग्रेसच्या ‘त्या’ चुकीची जबाबदारी घेण्यास मी तयार! राहुल गांधींचा Video व्हायरल

Rahul Gandhi's Response to Operation Blue Star : अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Rajanand More

Rahul Gandhi Political News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिकेतील एक व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. एका शीख तरुणाच्या 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टारवरील प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी दिलेल्या उत्तरावरून आता वाद निर्माण झाला आहे. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काँग्रेसची चूक होती, त्याची जबाबदारी आता आपण घ्यायला तयार असल्याचे मोठं विधान राहुल यांनी केले आहे.

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका शीख तरुणाने राहुल यांना या ऑपरेशनबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राहुल म्हणाले की, मला वाटत नाही की शीख कोणत्याही गोष्टीला घाबरतात. 80 च्या दशकांत जे झाले ते चूक होते. काँग्रेसच्या ज्या काही चुका झाल्या, त्याची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे.

मी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हटले आहे की, 80 च्या दशकांत जे झाले ते चूकीचे होते. मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे. शीख समाजासोबत माझे चांगले नाते आहे, असेही राहुल म्हणाले. या कार्यक्रमामध्ये शीख तरुणाने विचारले होते की, तुम्ही शिखांविषयी बोलता. पण शिखांमध्ये तुम्ही भीती निर्माण करत आहात की, भाजप काय करणार? आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे. काँग्रेसच्या राज्यात ते मिळाले नाही.

कोर्टाने सज्जन कुमार यांना शिक्षा दिली, पण काँग्रेसमध्ये अजूनही सज्जन कमार सारखे अनेक लोक आहेत, असेही या शीख तरुणाने म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राहुल यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. राहुल गांधी यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, ‘आता राहुल गांधी यांच्यावर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही टीका होऊ लागली आहे.’ तर काही नेत्यांनी ही राजकीय सर्कस असल्याचे सांगत राहुल यांची खिल्ली उडवली आहे. राहुल यांच्यामध्ये अजूनही नम्रता नाही, ते माफी मागत नाहीत, अशी टीका काही नेत्यांनी केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT