Manoj Naravane Sarkarnama
देश

Manoj Naravane: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या हल्ल्यानंतर 'अभी पिक्चर बाकी है' म्हणणारे मनोज नरवणे आता काय म्हणाले?

Manoj Naravane Comment on India Pakistan War: "युद्धाचा आनंद व्यक्त करणे योग्य नाही. शांतता हाच खरा विजय आहे,’ कोणत्याही समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असून, युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही,"

Mangesh Mahale

Pune, 12 May 2025 : पहलगाम हल्लाचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांच्या आकांना करारा जवाब दिला आहे.पहलगाम दहशतवादी हल्लाला उत्तर देण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले.

पाकिस्तानने युद्ध् करारचा तोडल्यामुळे अजूनही ऑपरेसन सिंदूर सुरु राहाणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे. तर माजी लष्करप्रमुख (नि) मनोज नरवणे यांनी भारत-पाक तणावावर आपली भूमिका मांडली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदा पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी अभी पिक्चर बाकी है असं सांगून पाकिस्तानचं टेन्शन अधिकच वाढवलेलं होते. मात्र काल त्यांनी युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही; बॉलीवूडचा सिनेमा नाही, असे म्हटलं आहे.

यु्द्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहावे, असे नरवणे म्हणाले. युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही; बॉलीवूडचा सिनेमा नाही. युद्ध हा गंभीर विषय आहे. युद्धामुळे मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विस्थापन असे अदृश्य, पण खोल सामाजिक नुकसान होते, असे ते म्हणाले.

नरवणे म्हणाले, "युद्धाचा आनंद व्यक्त करणे योग्य नाही. शांतता हाच खरा विजय आहे,’ कोणत्याही समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असून, युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही," नरवणे पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. हवाई दलाने काल टि्वट करीत ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दहशतवाद संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव आणि यातून झालेले परस्परांवरील हल्ले-प्रतिहल्ल्यांची माहिती भारताच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्ट. जनरल राजीव घई यांच्यासह हवाई व नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमध्ये मोठ्या दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले.

जम्मू, उधमपूर, पठाणकोट, डलहौजी, फलौदी या भागात पाकिस्तानने हल्ले केले. भारतील सैन्याने त्यांची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली. त्यांनी भारतीय हवाई तळांवर आणि लष्करी ठाण्यांवर हल्ले सुरू केल्यावर आम्ही चोख प्रत्युत्तर देत हल्ले केले.पाकिस्तानची दुखरी नस असलेल्या एअरबेस कमांड सिस्टम आणि लष्करी हवाई तळांना भारतीय सैन्यानं लक्ष्य केले. त्यामुळे पाकिस्तानचे एअरबेसचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT