भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवून लावले आहे. भारतीय लष्कराचे तीनही दल पाकिस्तानला चोख उत्तर देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे.पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये पळापळ सुरु झाली आहे. भारतीय सैन्य पीओकेमध्ये 60 किलोमीटरमध्ये आत घुसले आहेत. पाकिस्तानची सात शहर भारताच्या निशाण्यावर आहेत.
परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आहे. एस.जयशंकर हे जगभरातील काही प्रमुख देशाशी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा करीत आहेत.
भारताने पाकिस्तानचे अनेक क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानची हायटेक लढाऊ विमाने एफ-१६ आणि जेएफ-१७ भारतीय सैन्याने पाडली आहेत. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार केला जात आहे. असून, त्याला भारतचोख प्रत्युत्तर देत आहे. भारताच्या सीमावर्ती भागात विशेषत: राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट मोडवर आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आहे.
कुपवाडा, उरी आणि बारामुल्ला मध्ये पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. नियंत्रण रेषेच्या आजूबाजूच्या सर्व शहरांमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानचे दोन वैमानिक पकडले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.