Saifullah Khalid Shot Dead Sarkarnama
देश

Saifullah Khalid : पाकिस्तानातच लष्कर-ए-तोयबाला मोठा झटका! भारतविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या

Saifullah Khalid Shot Dead : ऑपरेशन सिंदूर करत भारताने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर करत भारताने पाकिस्तानचा दशतवाद्यांना पोसणारा खरा चेहरा जगासमोर आणला. अशातच आता भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असतानाच लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खात्मा करण्यात आला आहे.

Jagdish Patil

Saifullah Khalid Shot Dead : ऑपरेशन सिंदूर करत भारताने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर करत भारताने पाकिस्तानचा दशतवाद्यांना पोसणारा खरा चेहरा जगासमोर आणला.

अशातच आता भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असतानाच लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तीन अज्ञान बंदुकधार्‍यांनी गोळ्या झाडून त्याला मारलं आहे.

खालिदची हत्या लष्कर-ए-तय्यबासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर खालिदवर गोळीबार नेमका कोणी केला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्याच्या हत्येमुळे एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

लष्कर-ए-तय्यबाचा टॉपचा दहशतवादी अशी ओळख असलेला रझाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबु साइउल्ला हा 2006 साली नागपुरातील संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता. तो मागील अनेक वर्षांपासून नेपाळमधून संघटनेचं नेटवर्क सांभाळत होता.

तर त्यानंतर तो पाकिस्तानच्या सिंध प्रातांतील मतली, बदनीमध्ये काम करत होता. सैफुल्लाह खालिद हा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेटिव होता. लष्कर-ए-तोयबाने भारतावर हल्ला करण्याचं टास्क त्याला दिलं होतं. यासाठी तो मागील अनेक काळापासून नेपाळमध्ये राहत होता.

खालिद नेपाळमधून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्लॅनिंग करायचा. मात्र, त्याच्या या कारनाम्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थेला मिळताच त्याने नेपाळ सोडलं आणि पाकिस्तानात जाऊन राहिला होता. अखेर त्याचा पाकिस्तानाच अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT