Waqf Board JPC, Arvind Sawant Sarkarnama
देश

Waqf Bill JPC News : अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित; ‘वक्फ’च्या बैठकीत सत्ताधारी-विरोधक भिडले

Joint Parliamentary Committee Nishikant Dubey Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावे, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसैन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्लाह, नदीमुल हक आणि इम्रान मसूद या खासदारांचाही त्यामध्ये समावेश आहे.

Rajanand More

New Delhi News : वक्फ बोर्ड सुधारित बिलासाठी बनविण्यासाठी आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर सर्वच विरोधी खासदारांना आवाज उठवला. त्यामुळे गोंधळ वाढल्याने बैठक काही वेळात स्थगित करावी लागली.

सत्ताधारी व विरोधी खासदारांमध्ये वाद वाढल्याने समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी विरोधी पक्षाच्या सर्व दहा खासदारांना समितीतून एक दिवसासाठी निलंबित केले. आता समितीची पुढील बैठक 27 जानेवारीला होणार असल्याचे समजते. निलंबित खासदारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे.

कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावे, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसैन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्लाह, नदीमुल हक आणि इम्रान मसूद या खासदारांचाही त्यामध्ये समावेश आहे. समितीच्या बैठकांच्या तारखांवरून वाद झाल्याचे समजते. कल्याण बॅनर्जी यांनी 21 जानेवारीला बैठक झाल्यानंतर आज लगेच बैठक का बोलावली, यावरून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर भाजपचे दुबेंनी आक्षेप घेतला आणि वाद निर्माण झाली.

बॅनर्जी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 21 जानेवारीला बैठक झाल्यानंतर अध्यक्षांनी 24 आणि 25 जानेवारीला पुढील बैठक होईल, याची माहिती खासदारांना दिली. इतर सदस्यांनी त्याविरोधात पत्र लिहिले. पुढी बैठक 30 किंवा 31 जानेवारीनंतर घेण्याची विनंती आम्ही केली. पण अध्यक्षांनी ऐकले नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रम स्थगित करून आम्ही बैठकीसाठी आलो.

गुरूवारी रात्री आम्हाला मेसेज आला की जेपीसीची बैठक 24 आणि 27 जानेवारीला होईल. 25 तारखेला होणार नाही. जेपीसीमध्ये अघोषित आणिबाणी आहे. बैठक सुरू असताना ते कॉल घेतात आणि त्यानुसार कामकाज चालते. इतरांच्या निर्णयांची ते अंमलबजावणी करतात. आम्ही विरोध करताच अध्यक्षांनी दहा खासदार निलंबित केले. विरोधकांशिवाय चर्चा व्हावी, असे त्यांना वाटते, अशी टीका बॅनर्जी यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT