CM Siddaramaiah : सिद्धरामय्यांना ‘क्लीन चिट’? ‘मुडा’ भूखंड घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून चौकशी पूर्ण

Muda plots scam case : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांच्या कथित मुडा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणी वाढल्या आहेत. पण आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कर्नाटक राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात सिद्धरामय्या यांच्या पत्नीचे (पार्वती) नाव आल्याने ते संकटात सापडले आहेत. आता या प्रकरणाची लोकायुक्त चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल तयार झाला आहे. लोकायुक्तांच्या हा अहवाल सोमवारी (ता.27) न्यालयात सादर केला जाणार आहे. पण आता याच अहवालावरून कर्नाटकात गदारोळ सुरू झाला आहे.

सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या या लोकायुक्तांच्या अहवालात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कर्नाटकमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

‘मुडा’ भूखंड घोटाळ्यात सिद्धरामय्या यांचा हात कुठेच दिसत नाही, असे लोकायुक्तांच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर या प्रकरणात अधिकारी जबाबदार असून त्यांच्याकडून जमीन हस्तांतरित करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे. तर ‘मुडा’ आयुक्त व महसूल अधिकारी नियमांची पायमल्ली करत असल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

Siddaramaiah
CM Siddaramaiah : ‘...तर मी राजीनामा देतो’; कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना का दिले आव्हान ?

तर आता प्रकरणात गुन्हा करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत पुढे काय करायचे, याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचेही कळत आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत माजी आयुक्त नटेश आणि माजी अध्यक्ष एच. व्ही. राजीव यांच्या भेटीचा ऑडिओ उपलब्ध झाला आहे. त्या बैठकीत सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या, आमदार तन्वीर सेठ, जी. टी. देवेगौडा, एस. ए. रामदास, एल. नागेंद्र, विधान परिषद सदस्य मरितिब्बे गौडा यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग होता.

बैठकीत भूखंड वाटप 50-50 अशा प्रमाणावर चर्चा झाली. लोकायुक्त पथकाने याची माहिती गोळा करून अहवाल तयार केला आहे. लोकायुक्त सोमवारी (ता.27) ‘मुडा’ घोटाळ्याचा तपास अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत. लोकायुक्त पोलिस अधीक्षख टी. जे. उदेश यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला असून अहवाल तयार करण्यात आला आहे.

‘ईडी’ तपासात प्रगती

दुसरीकडे, ‘मुडा’ घोटाळ्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सीबीआयच्या तपासावर उच्च न्यायालय 27 जानेवारीला निकाल देईल, अशी अपेक्षा आहे.

Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटक सरकार धोक्यात? भाजपकडून काँग्रेस आमदारांना 50-50 कोटींची ऑफर'; CM सिद्धरामय्यांचा मोठा आरोप

‘क्लीन चिट’बाबत माहिती नाही

दरम्यान या ‘क्लीन चिट’बाबत आपल्याला कोणतीच माहिती नाही किंवा तशी कोणतीच कल्पना नाही अशी सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रीया दिली आहे. दरम्यान कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलणार का? या प्रश्नावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, हायकमांडने घेतलेला निर्णय अंतिम असेल. पण आता अर्थसंकल्पाची तयारी करायची असल्याने आपण दावोसलाही गेलो नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com