Opposition Meeting Sarkarnama
देश

Opposition Meeting in Bengaluru : भाजपविरोधातील लढ्याचं रणशिंग उद्धव ठाकरे मुंबईतूनही फुंकणार !

National Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी बंगळूरूत विरोधीपक्ष नेत्यांची बैठक पार पडली.

सरकारनामा ब्यूरो

Opposition Meeting News:  भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी विरोधी ऐक्याची पुढची बैठक मुंबईत बोलवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना नेमका 'मेसेज' देण्याचा डाव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी टाकला आहे. ही बैठक बोलवतानाच भाजपला घाबरु नका, आम्ही आहोत असा शब्दही ठाकरेंनी विरोधकांच्या व्यासपीठावरच दिला. विरोधकांना मुंबईत आणून ठाकरे एकप्रकारे भाजपला ताकद दाखवून देणार असल्याचेही उघड आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी बंगळूरूत विरोधीपक्ष नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज्यातील काँग्रेस नेतेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला भाजपविरोधी २६ पक्षांनी सहभागी झाले होते.या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे भाजपला आव्हानच दिले आहे. दरम्यान, विरोधकांची पुढची बैठक मुंबईत घ्याच असा आग्रह करून ठाकरेंनी या बैठकीतील नेत्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज हुकूमशाही विरोधात देशातील जनता एकत्रित येत आहे. या भारतासाठी आम्ही लढणार आहोत, त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. राजकारणात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत आणि यालाच तर लोकशाही म्हणतात. काही लोकांना वाटतयं की आम्ही कुटूंबासाठी लढत आहोत. पण ही लढाई कुटूंबाची, पक्षांची नाही, हा देश आमचे कुटूंब आहे, या कुटूंबासाठी आम्ही लढत आहोत.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आमची लढाई ही एका पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही.आमची लढाई ही विचारधारा आणि हुकूमशाहीच्या विरोधात आहे. एकेकाळी जशी स्वातंत्र्यासाठी लढाई झाली होती. पण आता हे स्वातंत्र्यचं धोक्यात आले आहे. आम्ही पुन्हा स्वातंत्र्यासाठी एकत्र आलो आहोत. मला विश्वास आहे,ही लढाई आम्ही नक्की जिंकू.

लोकांना भिती वाटतेयं की आता काय होणार, मला लोकांना विश्वास द्यायचा आहे की घाबरु नका आम्ही आहोत. चिंता करु नका, एक व्यक्ती किंवा एक पक्ष देश होऊ शकत नाही," असही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी पुढची बैठक आपण मुंबईत घेऊ, अस सांगत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह उपस्थित विरोधी पक्षांना बैठकीचं आमंत्रणही दिलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT